जनावरांसाठी विंधन विहीर
हिमायतनगर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीकडून बैल बाजारात येणाऱ्या पशू व पशुपालकांची तहान भागविण्यासाठी बोअर मारण्यात आला. यावेळी सभापती प्रकाश वानखेडे, माजी संचालक शेख रफीक, संतोष पाटील, सचिव नागोराव माने, शिवाजी पवार, हिलाल भाई, बाबुराव शिंदे उपस्थित होते.
कोरोना जनजागृती
नायगाव : सुजलेगाव येथील नटराज सांस्कृतिक कला पथकाने कोरोना जनजागृतीचा कार्यक्रम ठिकठिकाणी घेतला. कोरोनाची काळजी कशी घ्यावी, याची माहिती कला पथकाने नागरिकांना दिली.
सपोनि केंद्रे यांना निरोप
मांडवी : येथील सपोनि संतोष केंद्रे यांची मुखेड येथे बदली झाल्याने त्यांना एका कार्यक्रमात निरोप देण्यात आला. यावेळी नूतन सपोनि मल्हार शिवरकर यांचे स्वागत करण्यात आले. याशिवाय मांडवीतील पो.कॉ. वैजनाथ मोटरगे यांनाही निरोप देण्यात आला. कार्यक्रमाला अनेकांची उपस्थिती होती.
जिल्हा महामंत्रिपदी भालेराव
अर्धापूर : भाजपाच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या महामंत्रिपदी रामराव भालेराव यांची निवड झाली. खा.प्रताप पाटील चिखलीकर, जिल्हाध्यक्ष गंगाधरराव तावडे, नीलेश देशमुख, बालाजी स्वामी, डॉ.संजय सोनटक्के यांच्या उपस्थितीत त्यांना नियुक्तिपत्र देण्यात आले.
महेश शर्मा रुजू
मुदखेड : येथील पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक म्हणून महेश शर्मा यांनी सूत्रे स्वीकारली. यापूर्वीचे सुनील निकाळजे यांची नियंत्रण कक्षात बदली झाली. दरम्यान, शर्मा यांचा अनेकांनी सत्कार केला.
विश्वकर्मा जयंती मंडळ
लोहा : दरवर्षी प्रमाणे याही वर्षी विश्वकर्मा जयंती मंडळाची बैठक हभप आत्माराम महाराज रायवाडीकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी जयंती मंडळाची कार्यकारिणी निवडण्यात आली. कार्यकारिणी अशी- अध्यक्ष दिगंबर पांचाळ, उपाध्यक्ष साईनाथ पांचाळ, सचिव केशव पांचाळ, सहसचिव सचिन खरजुरे, कोषाध्यक्ष देवानंद पांचाळ. २५ फेब्रुवारी भगवान श्री विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
आदर्शला सुवर्ण पदक
लोहा : येथील नारायणा इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी आदर्श लांडगे याने नॅशनल सायन्स ऑलंपियाडमध्ये सुवर्ण पदक मिळविले. या यशाचे श्रेय त्याने आई-वडील व गुरुजनांना दिले. या यशाबद्दल त्याचे अनेकांनी स्वागत केले.
कोरेाना गीत गायन
नायगाव : जिल्हा माहिती जनजागृती गायन पथक शाहीर बळीराम सुजलेगावकर यांच्या संचाने २ फेब्रुवारी रोजी शासनाच्या विविध योजनांची माहिती गायनाद्वारे दिली, तसेच कोरोना गीत गायन सादर केले. या पथकात माधव पवार, नागोराव वडजे, व्यंकट पांचाळ, गंगाधर वाघमारे, पूजा आईलवाड, लक्ष्मीबाई कोचमवाड, संभाजी वाघमारे, गंगाधर वाघमारे, गंगाधर कोचमवाड यांचा समावेश होता.
सलगर यांच्याकडे पदभार
नांदेड : जिल्हा परिषद माध्यमिक विभागाचा शिक्षणाधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार माधव सलगर यांच्याकडे देण्यात आला. यापूर्वीचे बालासाहेब कुंडगीर निवृत्त झाल्याने ही जागा रिक्त होती. दरम्यान, सलगर यांचे अनेकांनी स्वागत केले.
महानगराध्यक्षपदी सोनसळे
नांदेड : बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या महानगराध्यक्षपदी रवि सोनसळे यांची निवड झाली. या निमित्ताने ३१ जानेवारी रोजी बैठक घेण्यात आली. यावेळी महाराष्ट्र सचिव नाथा कांबळे, जिल्हा सचिव दयानंद गायकवाड, चंद्रमुनी गायकवाड, चंद्रकांत वाघमारे, विनोद वाघमारे, महिला आघाडीच्या वंदना जाधव, वकील संघाचे अध्यक्ष ॲड.गौतम किनीकर, भीमराव पाईकराव आदी उपस्थित होते.