सध्या शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात मुलांना उपचारासाठी आणले जात आहे. त्यामध्ये साधारणत: सर्दी, ताप, खोकला ही लक्षणे आहेत. रुग्णालयात तापाची औषधे देऊन उपचार केले जात आहेत. त्यानंतरही आजार कमी न झाल्यास मात्र डेंग्यू तसेच टायफाईडची चाचणी केली जात आहे. काही मुलांना डेंग्यूची लक्षणे आढळल्यानेही चिंता वाढली आहे. मुलांना डासांपासून सुरक्षित ठेवण्याचा सल्लाही दिला जात आहे.
५० टक्के मुलांची कोरोना चाचणी
n जिल्ह्यात कोरोना संशयित मुलांची चाचणी करण्याचा सल्लाही डॉक्टर देत आहेत. ग्रामीण भागात नऊ टक्के मुले पहिल्या लाटेत बाधित झाली होती.
n मुले बाधित येण्याचे प्रमाण जवळपास १ टक्का इतकेच होते.
डेंग्यू-मलेरियाची चाचणी
ताप, सर्दी, खोकला ही लक्षणे असलेल्या मुलांना उपचार दिल्यानंतरही आजार कमी न झाल्यास डेंग्यू, मलेरियाची चाचणी केली जात आहे. शहरात सध्या डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत. जवळपास ३५ रुग्ण असल्याचे सांगितले जात असले तरीही प्रत्यक्षात ही संख्या मोठी आहे.
सध्या पावसाच्या दिवसात मुलांना आजार होण्याचे प्रमाण जास्त असते. यात वातावरणातील बदल हे एक कारण आहेच. पण त्याचवेळी दूषित पाण्यामुळे मुले आजारी पडू शकतात. घर व परिसरातील स्वच्छता या काळात अत्यंत गरजेचे आहे.
- डॉ. हंसराज वैद्य
बालरोगतज्ज्ञ
लहान मुले पावसात खेळतात, भिजतात. यातून सर्दी, ताप असे आजार होतात. डासांपासून मलेरिया, डेंग्यू आजारांची भीती आहे. त्यामुळे या काळात सांभाळणे गरजेचे आहे. सकस आहारही मुलांच्या आरोग्यात महत्त्वाची बाब आहे.
- डॉ. सलीम तांबे
बालरोगतज्ज्ञ