लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : कृष्णूर येथील मेगा अॅग्रो अनाज कंपनीत गेलेल्या शासकीय धान्य घोटाळ्याचा तपास काही दिवसांपूर्वीच सहाय्यक पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्याकडून काढून तो सीआयडीकडे सोपविण्यात आला होता़ त्यानंतर बुधवारी सीआयडीचे पथक नांदेडात या प्रकरणाच्या चौकशीसाठी दाखल झाले होते़ दिवसभर पथकाने स्थानिक गुन्हे शाखेत या घोटाळ्याशी संबंधित कागदपत्रांची तपासणी केली़खुपसरवाडी येथील शासकीय धान्य गोदामातून दहा ट्रक धान्य कृष्णूर येथील मेगा अॅग्रो अनाज कंपनीत गेल्याचे पोलिसांच्या धाडीवरुन उघडकीस आले होते़ या धाडीनंतर पोलिसांनी दहा ट्रक धान्य जप्त करीत कंपनीला सील ठोकले होते़तसेच या प्रकरणात कंपनीचे संचालक, व्यवस्थापक, धान्य वाहतूक ठेकेदार यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता़ तब्बल दोन महिने धान्याचे हे ट्रक पोलिसांच्याच ताब्यात होते़ त्यामुळे त्याला कोंबही फुटले होते़ त्यात कंपनीच्या गोदामात धान्याची नेमकी पोती किती? यावरुनही बराच गोंधळ उडाला होता़ गोदामात गव्हाची कमी अन् भुश्श्याची अधिक पोती आढळली होती़ त्यानंतर पोलीस आणि महसूल प्रशासनामध्ये ‘अहवालयुद्ध’ रंगले होते़पोलीस कारवाईचे समर्थन करीत होते तर महसूल मात्र पोलिसांची कारवाई चुकीची असल्याचा दावा करीत होते़ या दरम्यान, वाहतूक ठेकेदार पारसेवार आणि व्यवस्थापक तापडिया यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला़ त्यात काही दिवसांपूर्वीच या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला होता़ त्याअनुषंगाने बुधवारी सीआयडीचे पथक नांदेडात दाखल झाले होते़या पथकाने दिवसभर स्थानिक गुन्हे शाखेत पोलिसांनी जप्त केलेल्या कागदपत्रांची तपासणी केली़ तसेच महसूल प्रशासनाशीही संपर्क साधला़ या पथकाकडून हा तपास पूर्ण करण्यात येणार आहे़ तर दुसरीकडे कंपनीने या प्रकरणात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे़
सीआयडीचे पथक नांदेडात दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 12:41 AM
लोकमत न्यूज नेटवर्क नांदेड : कृष्णूर येथील मेगा अॅग्रो अनाज कंपनीत गेलेल्या शासकीय धान्य घोटाळ्याचा तपास काही दिवसांपूर्वीच सहाय्यक ...
ठळक मुद्देकृष्णूर धान्य घोटाळादिवसभर केली कागदपत्रांची तपासणी