उमरी : वीजपुरवठ्यासाठी डीपी व पाणीप्रश्नावरून शेतकरी तसेच अनेक नागरिक टंचाई निवारण कृती आराखडा बैठकीत कमालीचे आक्रमक झाले. यावेळी शेतक-यांनी वीजपुरवठ्याबाबत असंख्य तक्रारी करीत कार्यकारी अभियंत्यांना चांगलेच धारेवर धरले. आ. वसंतराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.दरवर्षी पाणीटंचाई निवारणार्थ कृती आराखडा बैठक घेण्यात येते. प्रोसिडिंगमध्ये लोकांच्या समस्या लिहून घेतल्या जातात. मात्र त्याची पूर्तता केली जात नाही. त्यावर कसलीच कार्यवाही होत नाही. पुन्हा पुन्हा तेच प्रश्न उपस्थित होतात. अशा बैठकांचा आम्हाला काय उपयोग? असा महत्त्वाचा प्रश्न अनेक सरपंचांनी उपस्थित केला. यावेळी आ. वसंतराव चव्हाण यांनी मध्यस्थी करून लोकांना शांत केले. उमरी तालुक्यात सध्या विजेचा प्रश्न गंभीर बनला असून दोन-दोन वर्षांपासून कोटेशन भरूनही शेतक-यांना विजेची जोडणी मिळत नाही. तालुक्यात सुमारे पन्नास डीपी बंद पडल्या असून अद्यापपर्यंत नवीन डीपी बसविण्याबाबत कसलीच कार्यवाही होत नाही.फ्युज, किटकॅट तसेच केबल वायर शेतक-यांना विकत आणून बसविण्याची पाळी आली आहे. डीपी जळाल्यास कित्येक दिवस त्याची कोणीही दखल घेत नाही. नवीन डीपी आणण्यासाठी वाहतुकीचा भूर्दंड शेतक-यांनाच बसत आहे. यावर्षी पाऊस कमी झाला. पावसाअभावी बहुतांशी पिके वाळून गेली. खरीप हंगाम वाया गेला. शेतीमध्ये बी-बियाणे व मशागतीचाही खर्च निघाला नाही. एकंदरीत या भागातील शेतकरी वर्गाचे अर्थकारणच बिघडले आहे.उमरी तालुका शासनाच्या दप्तरी दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर झाला असला तरी अद्याप कसलीच मदत वा अनुदान शेतकरीवर्गाला मिळालेले नाही. कर्जमाफीही झाली नाही. नवीन कर्ज देण्यासाठी बँका टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे वर्ष कसे काढायचे या विवंचनेत शेतकरीवर्ग त्रस्त आहे.महावितरणच्या अधिका-यांवर प्रश्नांची सरबत्तीकाही भागात विंधन विहिरी तसेच यूपीपीच्या सिंचनावर रबी तसेच उन्हाळी पिके घेण्यासाठी शेतकरी अहोरात्र मेहनत घेत आहेत.काही भागात तात्पुरती पाण्याची सोय असली तरीही वीजपुरवठा मात्र होत नाही. शेतीसाठी फक्त आठ तास वीजपुरवठा होतो. त्यातही अनेक वेळा वीज खंडित होते. केबल, किटकॅट, वायर, तारा आधी वीज साहित्याचा पुरवठा बंद झाला आहे. अशा असंख्य तांत्रिक अडचणीमुळे शेतकरीवर्ग मेटाकुटीस आला आहे. अशा परिस्थितीत अनेकवेळा महावितरणकडे लेखी अर्ज, विनंत्या करूनही त्याची पूर्तता होत नाही. यामुळे त्रस्त झालेल्या शेतक-यांनी आज कृती आराखडा बैठकीत महावितरणचे कार्यकारी अभियंता चटलावार यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. मात्र त्यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. यावेळी आ़वसंतराव चव्हाण यांनी हस्तक्षेप करीत अधिका-यांना खडे बोल सुनावले.विजेचा प्रश्न गंभीर, चव्हाण यांची मध्यस्थीबैठकीस पंचायत समितीचे सभापती शिरीषराव गोरठेकर, जि .प. सदस्य ललिता यलमगोंडे, उपसभापती पल्लवी मुंगल, पंचायत समिती सदस्य चक्रधर गुंडेवार, तहसीलदार श्रीकांत गायकवाड, गटविकास अधिकारी अमोलकुमार आंदेलवाड, नायब तहसीलदार राजेश लांडगे, रेड्डी, ज्येष्ठ कार्यकर्ते गोविंदराव सिंधीकर, प्रभाकर पुयड, भगवान मनूरकर, बंडू सर्जे, लिंगराम कवळे, संजय कुलकर्णी, बापूराव पाटील करकाळेकर, आनंदराव यलमगोंडे आदींची उपस्थिती होती़तर शेतक-यांचा उद्रेक होईल- आ़ चव्हाणविजेच्या बाबतीत शेतक-यांना होणारा त्रास अत्यंत गंभीर आहे. शेतकºयांचा यामुळे उद्रेक होईल व आम्हालाही ही परिस्थिती सांभाळणे अवघड जाईल. त्यासाठी संबंधित अधिका-यांनी अगोदरच योग्य ती उपाययोजना करावी, अशा सूचना आ. वसंतराव चव्हाण यांनी दिल्या.कार्यवाही करण्याचे आश्वासनविजेच्या बाबतीत शेतक-यांना होणारा त्रास अत्यंत गंभीर आहे. शेतक-यांचा यामुळे उद्रेक होईल व आम्हालाही ही परिस्थिती सांभाळणे अवघड जाईल. त्यासाठी संबंधित अधिकाºयांनी अगोदरच योग्य ती उपाययोजना करावी, अशा सूचना आ. वसंतराव चव्हाण यांनी दिल्या.
पाणीप्रश्नावर नागरिक आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2018 12:13 AM
यावेळी शेतक-यांनी वीजपुरवठ्याबाबत असंख्य तक्रारी करीत कार्यकारी अभियंत्यांना चांगलेच धारेवर धरले. आ. वसंतराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.
ठळक मुद्देउमरीत टंचाई निवारण बैठकअधिकाऱ्यांची उडाली भंबेरीलोकप्रतिनिधींची बैठकीस पाठ