पालकमंत्री चव्हाण यांनी शुक्रवारी मुंबई येथील जे.जे.रुग्णालयात लसीचा पहिला डोस घेतला, तर आ.मोहनराव हंबर्डे यांनी सोनखेड प्राथमिक आरोग्य केंद्रात लस घेतली.
गेल्या आठवड्याभरात नांदेड शहर व जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या २००च्या वर वाढताना दिसत आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने नांदेड शहरात अंशतः लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर आळा घालण्यासाठी प्रशासनाने विविध प्रकारचे निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. या सर्व गोष्टींबरोबरच नागरिकांनी कोरोना आजारावर प्रतिबंध म्हणून लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्याने लस देण्यात येत आहे. नागरिकांनी खासगी अथवा शासकीय लसीकरण केंद्रावर जाऊन कोरोना प्रतिबंध लस अवश्य घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री अशोकराव चव्हाण आणि आ.मोहन हंबर्डे यांनी केले आहे.