आजघडीला जिल्ह्यात ११ हजारांवर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दररोज त्यात किमान १५00 रुग्णांची भर पडत असून मृत्यूचे तर तांडव सुरू आहे. प्रशासन रोज नवीन आदेश काढत आहे; परंतु त्यामुळे प्रश्न सुटण्याऐवजी गुंतागुंतच अधिक होत आहे. सध्या खाजगी आणि शासकीय रुग्णालये हाऊसफुल्ल आहेत. नियंत्रण कक्षात बेडसाठी चौकशी केली असता त्यांच्याकडून खाजगी रुग्णालयांची नावे सांगितले जात आहे; परंतु रुग्णाची आर्थिक परिस्थिती नसल्याने तो जिल्हा रुग्णालय किंवा वैद्यकीय महाविद्यालय गाठत आहे; परंतु या ठिकाणी प्रवेशद्वारावरूनच बेड नसल्याचे सांगून परत पाठविण्यात येत आहे. प्रत्यक्षात या ठिकाणी रुग्णाची तपासणी करून त्याला पंजाब भवन किंवा गृह विलगीकरण, गरज पडल्यास रुग्णालयात दाखल व्हावे, असा सल्ला देण्याची गरज आहे; परंतु त्यांना पिटाळून लावले जात असून सैरभैर झालेला असा रुग्ण घरीच राहून बेडची वाट पाहत आजार अंगावर काढत आहे. त्यामुळे शहरात काही ठिकाणी कोविड ओपीडी सुरू केल्यास बेड न मिळलेल्या रुग्णांना योग्य सल्ला तरी मिळेल. यातून काही जणांचे जीव निश्चित वाचतील; परंतु प्रशासनाने तशी पावले उचलण्याची गरज आहे.
शहरात कोविड ओपीडीची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 4:16 AM