शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
5
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
6
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
7
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
8
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
9
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
10
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
11
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
13
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
14
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
16
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
18
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
19
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
20
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

विष्णूपुरी रुग्णालयात अंतर्गत वादातून सिटी स्कॅनला टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2018 12:05 AM

गेल्या अडीच महिन्यांपासून बंदच आहे़ महाविद्यालय प्रशासन आणि सिटीस्कॅन कंपनीच्या अंतर्गत वादात या मशीनची दुरुस्ती रखडली आहे़ त्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत असून सिटीस्कॅनच्या तपासणीसाठी त्यांची खाजगीत आर्थिक पिळवणूक करण्यात येत आहे़

ठळक मुद्देअडीच महिन्यांपासून मशीन बंदरुग्णांचे प्रचंड हाल

नांदेड : विष्णूपुरी येथील डॉ़ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अत्याधुनिक सिटीस्कॅन मशीन दुरुस्तीअभावी गेल्या अडीच महिन्यांपासून बंदच आहे़ महाविद्यालय प्रशासन आणि सिटीस्कॅन कंपनीच्या अंतर्गत वादात या मशीनची दुरुस्ती रखडली आहे़ त्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत असून सिटीस्कॅनच्या तपासणीसाठी त्यांची खाजगीत आर्थिक पिळवणूक करण्यात येत आहे़ याबाबत प्रशासनही फारसे गंभीर नसल्याचेच दिसत आहे़शहरात असलेल्या डॉ़ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे साधारणत: दोन वर्षांपूर्वी विष्णूपुरी येथे स्थलांतर झाले़ त्यावेळी स्थलांतरापूर्वीच अनेक महिने यंत्र व इतर साहित्य खरेदीचा सपाटा सुरु करण्यात आला होता़प्रत्यक्षात महाविद्यालय आणि रुग्णालय इमारतींची अनेक कामेही त्यावेळी पूर्ण झाली नव्हती़ अशावेळी कोट्यवधी रुपयांची यंत्रसामग्री मात्र येवून पडली होती़ त्यामध्ये जवळपास २५ कोटी रुपयांच्या सिटीस्कॅन मशीनचाही सहभाग होता़ शहरात रुग्णालय असताना या ठिकाणी अस्तित्वात असलेली जुनी सिटीस्कॅन मशीन सुरु असल्यामुळे नवीन मशीन कार्यान्वित करण्यात आली नव्हती़ त्यामुळे अनेक महिने ही मशीन धूळखात होती़ त्यातच त्याच्या देखभाल अन् दुरुस्तीत बरेच महिने असेच वाया गेले़महाविद्यालय आणि रुग्णालयाचे विष्णूपुरी येथे स्थलांतरण झाल्यानंतर या ठिकाणी नवीन सिटीस्कॅन मशीन सुरु करण्यात आली़ परंतु, त्यामध्ये वेळोवेळी तांत्रिक बिघाड येत होता़ दुरुस्तीसाठी लागणाऱ्या रकमेवरुन अनेकवेळा कंपनीचे अधिकारी आणि महाविद्यालय प्रशासन यामध्ये समन्वय होत नव्हता़ त्याचा परिणाम म्हणून अनेक दिवस या विभागाला टाळेच लावावे लागत होते़ आता पुन्हा एकदा गेल्या अडीच महिन्यांपासून याच कारणामुळे ही मशीन बंद आहे़संबंधित विभाग मात्र दिवाळीनंतर मशीनची दुरुस्ती करण्यात येणार असल्याचे सांगत आहे़ परंतु, प्रत्यक्षात ती कधी सुरु होईल, याबाबत साशंकताच आहे़ यामध्ये रुग्णांचे मात्र प्रचंड हाल होत आहेत़ रुग्णांना हजारो रुपये मोजून बाहेरुन या तपासण्या कराव्या लागत आहेत़गरीब रुग्णांची आर्थिक पिळवणूकशासकीय रुग्णालयात शेजारील तेलंगणासह हिंगोली, परभणी, यवतमाळ जिल्ह्यांतून रुग्ण उपचारासाठी येतात़ यामध्ये अपघाताच्या रुग्णांची संख्याही अधिक असते़ त्यामुळे अशा रुग्णांची सिटीस्कॅन तपासणी होणे गरजेचे असते़परंतु, या ठिकाणी मशीन बंद असल्यामुळे अत्यवस्थ असलेल्या रुग्णाला पुन्हा रुग्णवाहिकेतून शहरातील खाजगी सिटीस्कॅन केंद्रात तपासणीसाठी आणावे लागते़ यामध्ये रुग्णाच्या जीविताला धोकाही निर्माण होवू शकतो़ त्याचबरोबर खाजगीत तपासणीसाठी एका रुग्णाकडून साधारणत: दोन हजार रुपयांपासून ते पाच हजार रुपये दर आकारले जाते. त्यामुळे गरीब रुग्णांची आर्थिक पिवळणूक होते़ परंतु, या गंभीर प्रकाराबाबत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी दोघेही फारसे गंभीर नसल्याचेच दिसत आहे़

टॅग्स :Nandedनांदेडhospitalहॉस्पिटलHealthआरोग्य