लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : संगीत शंकर दरबारच्या दुस-या दिवशीच्या दुस-या सत्रात प्रशांत गाजरे आणि उस्ताद राशीद खाँ यांचे शिष्य नागेश आडगावकर यांच्या शास्त्रीय गायनाने रसिक मंत्रमुग्ध झाले.दुस-या दिवशीच्या दुसºया सत्रात ताल कचेरी हा प्रशांत गाजरे व संचाच्या कार्यक्रमास माजी राज्यमंत्री आ. डी. पी.सावंत, उदय निंबाळकर, कामाजी पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. गायक संजय जोशी, रत्नाकर अपस्तंभ, शिवदास देगलूरकर यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन झाले. गाजरे यांनी तीन तालमधील सोळा मात्रांचा तपशील सादर करताना मात्रांचा बिनचूक हिशेब ठेवला. तालातील पेशकार, कायदे, त्यातील वैशिष्ट्यपूर्ण लयकारीसह अवघड प्रकार सुस्पष्ट सादर केले. गाजरे यांना भार्गव देशमुख, स्वरेश देशपांडे, अभिषेक देशपांडे, स्वप्निल धुळे, स्वप्निल श्रीमंगले, वेदांत कुलकर्णी, स्वरुप देशपांडे यांनी साथसंगत केली.दुसºया सत्राचा समारोप नागेश आडगावकर यांच्या गायनाने झाला. राग मुलतानिक नागेशच्या दमदार गायिकेची झलक रसिकांना दिसली. प्रत्येक स्वराचे सच्चेपन, रागातील स्वरस्थान स्पष्ट करीत राग प्रस्तापित करण्याचे काम आडगावकर यांनी आपल्या गायनातून केले.खटकी, मुरकी, सरगत, बंदिशीच्या अंगाने बोलबांट, गायक युक्त तान, लयसी क्रीडा अशा विविध कला सादर करत आडगावकर यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. तबला व हार्मोनियमची संगत परोकार व फुलारी यांनी केली.
शास्त्रीय गायनाने रसिक मंत्रमुग्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 11:44 PM