शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

राज्यभर व्याप्ती असलेल्या नोकर भरती घोटाळ्यात लिपिक अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2020 5:27 PM

उमेदवाराच्या जागी अन्य व्यक्तीला बसवून नोकरी मिळवून देण्याच्या प्रकाराचा किनवट तालुक्यात पर्दाफाश करण्यात आला होता़

ठळक मुद्दे आतापर्यंत २०० जणांवर गुन्हाआतापर्यंत वर्ग- १ पासून ते वर्ग- ४ पर्यंत अनेक जणांना अटक

नांदेड : राज्यभर गाजलेल्या एमपीएससी आणि नोकरभरती घोटाळ्यात आतापर्यंत २०० जणांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत़ त्यात गुन्हे अन्वेषण विभागाने गोंदिया येथून  निखिल चव्हाण या लिपिकाला अटक केली आहे़ या प्रकरणातील मुख्य आरोपी  तुरुंगात आहे़

कोणत्याही नोकरीची जाहिरात निघाल्यानंतर उमेदवाराच्या जागी अन्य व्यक्तीला बसवून नोकरी मिळवून देण्याच्या प्रकाराचा किनवट तालुक्यात पर्दाफाश करण्यात आला होता़ योगेश जाधव या तरुणाने हे रॅकेट उघडकीस आणले होते़ त्यानंतर या प्रकरणात आतापर्यंत वर्ग- १ पासून ते वर्ग- ४ पर्यंत अनेक जणांना अटक करण्यात आली आहे़ आरोपी उमेदवाराकडून पदनिहाय रक्कम घेत होते़ मुख्य आरोपी प्रबोध मधुकर राठोड हा एमपीएससी आणि नोकर भरती घोटाळ्याचे रॅकेट चालवित होता़

उमेदवाराच्या जागी डमी परीक्षार्थी बसवून नोकरी मिळवून दिली जात होती़ हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक यासह इतर विभागांतील अनेकांना यामध्ये आरोपी करण्यात आले होते़ आतापर्यंत राज्यभरात या प्रकरणात २८ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत़ तर तब्बल २०० जणांना अटक करण्यात आली आहे़ नांदेडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या याच प्रकरणातील गुन्ह्यात गुन्हे अन्वेषण विभागाने गोंदिया येथील लिपीक निखिल चव्हाण याला अटक केली आहे़ चव्हाण याच्या जागी अन्य एकाला डमी उमेदवार म्हणून बसविण्यात आले होते़ पोलीस उपअधीक्षक साळुंके यांनी ही कारवाई केली़ गेल्या अडीच वर्षांपासून या प्रकरणाचा तपास सुरुच आहे.

शेत, घर विकून दिले होते अनेकांनी पैसेशासकीय नोकरी लागावी म्हणून अनेकांनी परिस्थिती नसतानाही घर, शेत यासह जवळील दागिने विकून लाखो रुपयांची रक्कम गोळा केली होती़ त्यानंतर ही रक्कम राठोड याला देण्यात आली होती़ राठोडकडून उमेदवाराच्या जागी परीक्षेसाठी डम्मी उमेदवार उपलब्ध करुन दिला जात असे़ परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर उर्वरित रकमेचा शेवटचा हप्ता दिला जात होता़ अशाप्रकारे महाराष्ट्र लोकसेवा आयोग यासह इतर स्पर्धा परीक्षांमध्ये राठोड याने अनेकांना नोकरी मिळवून दिली. परंतु या प्रकरणाचा भंडाफोड झाल्यानंतर अशाप्रकारे पैसे देऊन नोकरीला लागलेले अडचणीत आले आहेत.

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाfraudधोकेबाजीMaharashtraमहाराष्ट्रArrestअटकPoliceपोलिस