नांदेड: अगोदरच पाण्याअभावी दुबार पेरणी करावी लागलेल्या शेतकऱ्यांना पून्हा तिबार पेरणीचे संकट उभं ठाकलय. शेतकऱ्याची पीके पूर्णतः पाण्याखाली गेली आहेत. पुराच्या पाण्यामुळे पिकासह शेतीही खरडून गेलीय..अर्धापूर शहरातील दुर्गानगर भागात घरात पाणी शिरलं आहे. तर तालुक्यातील शेलगाव खु., शेलगाव बु.,शेणी, कोंढा, देळूब खु.देळूब बु. सह अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पुरामुळे पासदगाव मार्गे परभणीकडे जाणारी वाहतूक बंद, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
नांदेड जिल्ह्यातील आसना नदीला पूर आल्याने नांदेड-परभणी वाहतूक ठप्प झाली आहे. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने आसना नदीला पूर आला. अर्धापूर तालुक्यातील मेंढला नाल्यालाही पूर आलाय. पासदगाव जवळील आसना नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद करण्यात आलीये . नांदेड कडून परभणी आणि हिंगोलिकडे जाणाऱ्या वाहनधारकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
नांदेडात सखल भागात कमरे इतकं पाणी; नागरिक अडकले, आपत्ती व्यवस्थापन गायब मुसळधार पावसामूळे शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले. नांदेड शहरातील श्रावस्तीनगर , सादतनगर , तेहरा नगर , नोबेल कॉलनी या भागात कमरे इतक पाणी साचलं आहे . या भागात अनेक नागरिक अडकून पडले आहेत . घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचून नुकसान झाले . अजूनही पाऊस सुरू असल्याने पाणी वाढतच आहे . पाणी साचल्याने अनेकजण घर सोडून सुरक्षित स्थळी निघून गेले .या भागात पावसामुळे हाहाकार माजला असतांना महापालिकेची यंत्रणा किंवा आपत्ती व्यवस्थापन इथे पोहचले नाही . पावसाळ्यापूर्वी पालिकेने नाले सफाई केल्याचा दावा केला होता . पण चार तासाच्या पावसासोबत पालिकेचा दावा देखील वाहुन गेला . कारण श्रावस्तीनगर भागातील नाल्यातील पाणी या भागात साचले आहे.
दरम्यान, उमरी - नांदेड हायवे रस्त्यावरील गोरठा शिवारातील रेल्वेच्या भुयारी पूलाखाली पावसाचे पाणी साचल्याने या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद झालेली आहे.