लोकमत न्यूज नेटवर्ककिनवट : तेलंगणाच्या सीमेवरील जंगलातील नाल्यांचे पाणी व पावसाचे पाणी एकत्रित वाहल्याने नाल्यालगतची पिके शेतकºयांच्या हातून गेल्यात जमा आहेत. तोटंबा, मानसिंगनाईक तांडा, दीपलानाईक तांडा, चंद्रूनाईक तांडा, हुडी, कंचली, चिखली (ई), गोंड्रे महागाव, मार्लागुंडा, आंदबोरी (ई), कोसमेट, कोल्हारी, दुर्गानगर, पांगरपहाड या गावांना ८ जुलै रोजी झालेल्या जोरदार पावसाचा तडाखा बसून शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले. नाल्याकाठच्या शेतातील उभी पिके खरडली. शेतात पाणी जाऊन पिके पाण्याखाली आली. पानथळ जमिनीतील पिके पिवळी व पिंगट पडून हातून गेल्याने शेतकरी चिंतीत आहे.---२० घरांत शिरले पाणीमानसिंगनाईक तांडा येथील वीसहून अधिक घरांत पाणी शिरले.गुणाजी चव्हाण यांचे यात प्रचंड नुकसान झाले. नुकसानग्रस्त भागातील गावांना आ. प्रदीप नाईक व तहसीलदार नरेंद्र देशमुख यांनी भेट देवून पाहणी केली. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबतची बाब आ.नाईक यांनी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या निदर्शनास आणून देत चिंतीत शेतकºयांना दिलासा दिला. नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी आ. नाईक यांनी केली. गावोगाव दिलेल्या भेटीत चिंतीत शेतकºयांशी संवादही साधला.---ओढ्याला पूरनिवघा बाजार ते वरुलादरम्यान ओढ्याला पूर आल्यामुळे ओढ्याचे पाणी शेतीत घुसल्याने मोठे नुकसान झाले़ तर तल्लारी येथे घरांची पडझड झाली़
किनवट तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 12:44 AM
किनवट तालुक्यातील इस्लापूर, शिवणी भागातील १४ ते १५ गावांना रविवारी सायंकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. मानसिंगनाईक तांड्यासह काही गावांत ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने नाल्याकाठची शेती खरडून गेली. डोंगराच्या पायथ्याशी असलेली शेती जलमय झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. बहुतांश घरांत पावसाचे पाणी घुसल्याने घरात ठेवलेल्या वस्तू व खतांचे नुकसान झाले़
ठळक मुद्देडोंगराच्या पायथ्याशी असलेली शेती जलमय