नवीन नांदेड : जयप्रकाशनगर, असर्जन येथील एका ३१ वर्षीय सहशिक्षकाने गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना २ मे रोजी मध्यरात्री घडली. याप्रकरणी ३ मे रोजी नांदेड ग्रामीण ठाण्यात मयत सहशिक्षकाची पत्नी, सासू, सासरा व मेहुणीसह आठ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गाडीपुरा परिसरातील मूळ रहिवासी व गत काही महिन्यांपासून जयप्रकाशनगर, असर्जन कँप येथे वास्तव्यास असलेल्या शिवरतनसिंह धरमसिंह गहिलोत यांचा प्रेमनगर, नांदेड येथील कलावतीबाई केशरसिंह चौहान यांची मुलगी मयुरी हिच्यासमवेत ३१ डिसेंबर २०१८ रोजी जुना कौठा येथील साईबाबा मंदिरात विवाह झाला. विवाह झाल्यानंतर मुलगा शिवरतनसिंह गहिलोत व सून मयुरी यांचा संसार दोन महिने सुरळीत सुरू होता. त्यानंतर सून मयुरी आपला मुलगा शिवरतनसिंह याच्यासोबत कोणत्याही कारणावरून भांडण करीत होती, असा आरोप मयत शिवरतनसिंह यांचे वडील धरमसिंह गहीलोत यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद आहे़सून मयुरी हिने २७ एप्रिल रोजी मुलगा शिवरतनसिंह याच्यासोबत वादविवाद करून माहेरी निघून गेली. २ मे रोजी रात्री नऊच्या सुमारास धरमसिंह गहिलोत हे त्यांची पत्नी सुमित्राबाई, मुलगी कांचन तसेच लहान मुलगा किशोरसिंह यांच्यासोबत जेवण करून आपापल्या खोलीत झोपले. मोठा मुलगा शिवरतनसिंह हा जेवायचा असल्याने आईने जेवणाचे ताट किचनमध्ये ठेवले होते़ रात्री दहाच्या दरम्यान, शिवरतनसिंह हा घरी आला. पहाटे तीन वाजता शिवतरतनसिंह याच्या खोलीचे दार त्याच्या आईने ठोठावले़ मात्र, खोलीमधून कसलाच प्रतिसाद मिळाला नसल्याने त्यांनी कुटुंबातील सर्वांना जागे केले़ घरातील सर्वांनी खिडकीतून पाहिले असता, शिवरतनसिंह हा गळफास घेवून खोलीतील छताच्या लोखंडी हुकास लटकलेला दिसला.शिवरतनसिंह यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. ही चिठ्ठीही पोलिसांकडे देण्यात आली आहे. त्या चिठ्ठीमध्ये मुद्दा क्रमांक १ ते ६ मध्ये २७ एप्रिल पासूनचा सविस्तरपणे घटनाक्रम लिहिला आहे. त्या चिठ्ठीआधारे आपला मुलगा त्याची पत्नी मयुरी व सासू कलावतीबाई केसरसिंह चौहान यांच्यासह त्यांच्या आठ आरोपी नातेवाईकांनी दिलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केला आहे, असा आरोप मयताचे वडील धरमसिंह गहीलोत यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. मयत तरूण शिवरतनसिंह गहीलोत हे गत काही दिवसांपासून नांदेडच्या 'गुरूकुल'मध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होते, अशी माहिती वडील धरमसिंह गहीलोत यांनी दिली़भिंतीवर लिहिली सुसाईड नोटखोलीतील भिंतीवर हिंदीमध्ये 'मयुरी और उसकी माँ को मत छोडना. उसकी माँ ने तो मेरा संसार उध्वस्त करी, मेरी मौत का जिम्मेदारभी उसकी माँ (कलावतीबाई) और मयुरी है' व दुसऱ्या भिंतीवर मेरे मौत का जिम्मेदार मयुरी केसरसिंह चौहान और उसका पूरा खानदान है, उनको सजा जरूर मिलना, उसके दो मामा, दो मामी, एक माँ, एक बाप, एक बहन सब जिम्मेदार है, असा मजकुर लिहून त्याखाली स्वाक्षरी केली़
सहशिक्षकाने घेतला गळफास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2019 12:17 AM
जयप्रकाशनगर, असर्जन येथील एका ३१ वर्षीय सहशिक्षकाने गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना २ मे रोजी मध्यरात्री घडली. याप्रकरणी ३ मे रोजी नांदेड ग्रामीण ठाण्यात मयत सहशिक्षकाची पत्नी, सासू, सासरा व मेहुणीसह आठ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठळक मुद्देविवाहितेसह आठ जणांविरुद्ध गुन्हा