राज्यातील सरकारने ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ भाजपच्या ओबीसी आघाडीच्या नांदेड ते हैदराबाद महामार्गावरील चंदासिंघ कॉर्नर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी खासदार चिखलीकर बोलत होते. आंदोलनात जिल्हाध्यक्ष प्रवीण साले व ओबीसी मोर्चाचे महानगर जिल्हाध्यक्ष व्यंकटेश जिंदम यांच्यासह चैतन्यबापू देशमुख, डॉ. संतुकराव हंबर्डे, दिलीप कंदकुर्ते, व्यंकट मोकले, शीतल खांडील, अभिषेक सौदे, वैजनाथ देशमुख, धीरज स्वामी, महेश खोमणे, अनिलसिंह हजारे, सुनील मोरे, शंकर वाणेगावकर, प्रा. डॉ. बालाजी गिरगावकर, बालाजी पुयड, शततारका पांढरे, अश्विनी जाधव, चंचलसिंघ जट, सचिन रावका, विश्वांभर शिंदे, शैलेश ठाकूर, ॲड. दिलीप ठाकूर, नवल पोकर्णा, विजया गोडघासे, रत्नप्रभा गोकुलवाड, लक्ष्मण पांचाळ, सतीश बेरूळकर, संजय घोगरे, नगरसेविका बेबीताई गुपिले यांचा सहभाग होता. यावेळी डीवायएसपी. सिध्देश्वर भोरे, पाेनि. साहेबराव नरवाडे, पोनि. अशोक घोरबांड, पोउपनि. शेख असद, पोउपनि. आनंद बिचेवार, पोउपनि. गणेश होळकर, पोउपनि. बालाजी नरवटे उपस्थित होते.
पोलिसांनी २५ ते ३० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. आंदोलनामुळे या रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.