डॉक्टर- १५०
परिचारिका ३००
शिपाई- ७०
तंत्रज्ञ- ३०
रुग्णवाहिका चालक- २२
इतर- १२८
रुग्ण कमी झाल्यानंतर भरती केलेले हे कर्मचारी अचानक कमी झाल्यामुळे कार्यरत डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. शासनाकडून मात्र कोरोना काळात ज्याप्रमाणे अहवाल आणि इतर माहिती मागविण्यात येत होती तीच आजही कायम आहे.
कोट.......
कोरोना काळात इमाने-इतबारे जीव धोक्यात घालून सेवा दिली. तीन महिने घरी पण गेलो नाही. आज ना उद्या सेवेत कायम करतील या अपेक्षेत काम करीत राहिलो. परंतु आता रुग्ण कमी होताच कामावरून कमी करण्यात आले. जेव्हा गरज असेल तेव्हा पुन्हा बोलवू असे सांगण्यात आले. हे म्हणजे गरज सराे अन् वैद्य मरो असे आहे. अशी प्रतिक्रिया सेवक देविदास पवार यांनी दिली.
कोट....
कामाचे वेतन न मिळाल्याने मजुरी
जीव धोक्यात घालून केलेल्या कामाचे अद्याप वेतन मिळाले नाही. आयुर्वेद रुग्णालयात मी कर्तव्यावर होते. परंतु आता वेतनासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. घर कसे चालवावे म्हणून आता मजुरी करते. पंचफुलाबाई कांबळे- सेवक
कोट....
कोरोना काळात शासनाने कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ही भरती करण्यात आली होती. त्यानंतर शासनाने त्यांची सेवा समाप्तीचे आदेश दिले. त्यानुसार कार्यवाही करण्यात आली. परंतु सर्वांना त्यांच्या कामाचे वेतन मिळाले आहे. - डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा शल्य चिकित्सक