गंगाधर तोगरे।कंधार : स्वातंत्र्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत शे.का.प.विरूद्ध कॉग्रेस अशीच लक्षवेधी लढत मन्याडखो-यात होत होती. परंतु १९८९ नंतर मात्र राजकीय चित्र बदलत गेले. धोंडगे, चव्हाण, चिखलीकर या दिग्गज पुढाऱ्यांच्या भोवती कंधार-लोहा तालुक्यातील राजकारण सतत चर्चेत राहत आले आहे.२०१४ साली लोहा -कंधार विधानसभा मतदार संघात भाजपाचे अॅड. मुक्तेश्वर धोंडगे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी लोहा येथे आले होते. परंतु शिवसेनेचे प्रताप पा.चिखलीकर मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. आगामी विधानसभा निवडणूकीसाठी युती, आघाडी, वंचीत आघाडी कडून इच्छूकांची मोठी भाऊगर्दी होणार असल्याचे संकेत आहेत.त्यातच दिग्गज पुढाºयांच्या घरातून मात्र उमेदवारीसाठी राजकीय धुरांचा लोळ निघत असल्याचे चित्र आहे.लोहा-कंधार तालुक्यात कांही अपवाद सोडले तर सतत कॉग्रेस विरोधी राजकीय मतप्रवाह राहिला आहे. शेकापचे भाई डॉ. केशवराव धोंडगे यांनी सर्वाधिक वेळा कंधार विधानसभेचे प्रतिनिधित्व केले आहे.त्यांचा सलग विजयाचा विक्रम अद्याप अबाधित आहे. कै.गोविंदराव मोरे, ईश्वरराव भोसीकर या कॉग्रेसच्या नेत्याला विधानसभेचे प्रतिनिधित्व करण्याची कंधार विधानसभा मतदार संघातून संधी मिळाली. तसेच आणिबाणी नंतर झालेल्या विधानसभा निवडणूकीत भाई गुरूनाथराव कुरूडे यांनी विजय मिळविला. १९९५ व १९९९ सेनेकडून रोहिदास चव्हाण, २००४ साली अपक्ष प्रताप पा.चिखलीकर, २००९ साली रा.कॉ.चे शंकरअण्णा धोंडगे व २०१४ ला पुन्हा शिवसेनेचे प्रताप पा.चिखलीकर विजयी झाले. २०१९ मधील विधानसभा निवडणूक कमालीची चुरशीची होणार आहे.असेच एकंदरीत राजकीय चित्र समोर येत आहे.प्रताप पा.चिखलीकर हे नांदेड लोकसभा मतदार संघातून विजयी झाल्याने सेना -भाजपा युतीची उमेदवारी कोणाला मिळणार? याविषयी राजकीय तर्क -वितर्क काढले जात आहेत. मतदारसंघ शिवसेनेचा असला तरी भाजपाला सोडून घेण्यासाठी चिखलीकर प्रयत्नांंची शिकस्त करतील. अशा राजकीय चर्चा झडत आहेत. प्रवीण पा.चिखलीकर, शामसुंदर शिंदे, प्रणिताताई देवरे-चिखलीकर यांच्या नावाची चर्चा होत आहे. सेवानिवृत्त सनदी अधिकारी शामसुंदर शिंदे यांनी 'अभी नही तो कभी नही ' याप्रमाणे ग्रामीण भागात संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे.परंतु खा. प्रताप पाटील चिखलीकर हे कोणाच्या पारड्यात आपले राजकीय वजन टाकतात. यावरच उमेदवाराचे नाव निश्चित होईल. चिखलीकरांच्या राजकीय निर्णयाची त्यामुळे कसोटी लागणार असल्याचे बोलले जात आहे. मतदारसंघ शिवसेनेचा असल्याने अॅड.मुक्तेश्वर धोंडगे हेच सेना-भाजपा युतीचे उमेदवार राहतील. अशीच एकंदरीत राजकीय धुरीणाचे ठाम मत आहे. शिवसेनेचे शिवबंधन हातात बांधताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उमेदवारीचे वचन दिले.असे अॅड़ धोंडगे सह शिवसैनिक सागंत आहेत. अॅड़ धोंडगे यांनी मतदारसंघात बºयाच महिन्यापासून संपर्क वाढवत शिवसेनेच्या शाखा स्थापन करत पक्ष विस्तार वाढविण्यावर भर दिला आहे. २०१४ साली मोजक्या दिवसात अचानक उमेदवारी मिळाली. त्यामुळे मतदारसंघातील बºयाच गावात अपेक्षित संपर्क करता आला नाही. त्यासाठी २०१९ मधील निवडणुकीत यश मिळविण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे.राष्ट्रवादी कॉग्रेसचा हा मतदारसंघ असल्याने रा.कॉ - कॉग्रेस आघाडीकडून शंकरअण्णा धोंडगे यांना उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्यातच दिलीप धोंडगे यांच्या नावाचीही चर्चा होत आहे. परंतु मतदारसंघ अदलाबदलीत कॉग्रेसने जागा लढविली तर माजी आ.रोहिदास चव्हाण, सेवानिवृत्त सनदी अधिकारी अनिल मोरे, ता. कॉग्रेसचे अध्यक्ष बालाजी पांडागळे ,संजय भोसीकर यांची नावे चर्चेत आहेत. तसेच राज्यात कॉग्रेस- रा.कॉ.आघाडीत शे.का.प.असल्याने उमेदवारीचे राजकीय समीकरण बदलतील असा तर्क लावला जात आहे.शेकापकडून जागा सोडण्यासाठी प्रयत्न केले जातील. शेकापकडून माजी जि. प.सदस्य प्रा. डॉ. पुरूषोत्तम धोंडगे निवडणूक रिंगणात राहतील. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत वंचीत बहुजन आघाडीने आपली राजकीय ताकत सिद्ध केली. विधानसभा निवडणूकीसाठी रामचंद्र येईलवाड, पं.स.सदस्य शिवा नरंगले, नगरसेवक विनोद पापीनवार इच्छुक असल्याचे दिसते. प्रा.मनोहर धोंडे हे प्रस्थापित पुढाºयांच्या विरोधात सतत असतात. त्यामुळे तेही निवडणूक रिंगणात राहतील. अशीच राजकीय स्थिती आहे.
दिग्गज पुढाऱ्यांच्या घरातूनच उमेदवारीसाठी स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2019 12:44 AM
स्वातंत्र्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत शे.का.प.विरूद्ध कॉग्रेस अशीच लक्षवेधी लढत मन्याडखो-यात होत होती. परंतु १९८९ नंतर मात्र राजकीय चित्र बदलत गेले.
ठळक मुद्देमन्याड खो-यातील लक्षवेधी लढती सेना- भाजपा, काँग्रेस राकॉ, वंचित आघाडीकडून इच्छुकांची संख्या वाढली