शहरं
Join us  
Trending Stories
1
"गेल्या अडीच वर्षांपूर्वी CM शिंदे यांनाही अशीच धमकी आली होती, पण...!"; उदय सामंत यांचा खळबळजनक आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात महायुती की महाविकास आघाडी? सर्व्हेतील धक्कादायक आकडे आले समोर
3
"...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल"; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले 
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
5
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
6
'कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, साखर कारखाने २१ नोव्हेंबरनंतर सुरु करा'; सदाभाऊ खोतांनी केली मागणी
7
हिट अँड रन प्रकरणात BMW असलेल्या भाजपा नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, तपास सुरू
8
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
9
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
10
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
11
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
12
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
13
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
14
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
15
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
16
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?
17
केरळमध्ये ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने उडवलं; चौघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडेना
18
Vidhan Sabha Election: मतदान ओळखपत्र नसेल तर काळजी नको, हे १२ पुरावे चालतील; वाचा संपूर्ण लिस्ट!
19
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...
20
पवार कुटुंब एकत्र येणार? आमच्यात फक्त राजकीय मतभेद; सुनेत्रा पवारांचं मोठं विधान

कॉंग्रेसकडून अशोक चव्हाणांकडे पुन्हा मोठी जबाबदारी; राजकीय चिंतन समितीत केला समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 2:03 PM

यापूर्वी मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे चार राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातील काॅंग्रेस पक्षाच्या कामगिरीची समिक्षा करणाऱ्या समितीचे प्रमुख पद होते.

नांदेड - काॅंग्रेस पक्षाच्या उदयपूर येथे हाेणाऱ्या चिंतन शिबिरातील राजकीय प्रस्तावाबाबतच्या समितीत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशाेक चव्हाण यांचा समावेश करण्यात आला आहे. १३ ते १५ मे दरम्यान हे चिंतन शिबिर हाेणार आहे. यापूर्वी मंत्री चव्हाण यांच्याकडे चार राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातील काॅंग्रेस पक्षाच्या कामगिरीची समिक्षा करणाऱ्या समितीचे प्रमुख पद दिले होते. त्यानंतर ही दुसरी मोठी जबाबदारी मंत्री चव्हाण यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

काॅंग्रेस अध्यक्षा साेनिया गांधी यांनी हा निर्णय घेतला आहे. पक्षाचे महासचिव के. सी. वेणुगाेपाल यांनी याबाबतचे पत्र दिले आहे. या समितीत राज्यसभेचे विराेधी पक्षनेते मल्लीकार्जुन खरगे निमंत्रक, तर गुलाम नबी आझाद, अशाेकराव चव्हाण, एन. उत्तमकुमार रेड्डी, डाॅ. शशी थरूर, गाैरव गाेगाेई, सप्तगिरी शंकर उलाका, पवन खेरा व डाॅ. रागिनी नायक यांचा समावेश आहे.

ही समिती चिंतन शिबिरातील राजकीय प्रस्ताव तयार करण्याचे, तसेच याबाबतच्या विचार मंथनाचे संयाेजन करेल. अखिल भारतीय काॅंग्रेस कमिटीने अलीकडच्या काळात अशाेक चव्हाण यांच्यावर साेपवलेली ही दुसरी माेठी जबाबदारी आहे. यापूर्वी पश्चिम बंगाल, केरळ, तमिळनाडू, आसाम ही चार राज्य व पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशातील काॅंग्रेस पक्षाच्या कामगिरीची समिक्षा करणाऱ्या समितीचे प्रमुख म्हणूनही चव्हाण यांना नेमण्यात आले हाेते.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणcongressकाँग्रेस