शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?
2
पडळकरांकडून सरकारविरोधातच आंदोलनाचं हत्यार; रास्ता रोकोसाठी धनगर समााजाला केलं महत्त्वाचं आवाहन 
3
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
4
Maharashtra Politics : शिवसेना शिंदे गटात पक्षातंर्गत वाद?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटानं उडाली खळबळ
5
सिनेट निवडणुकीत चुरस; शिंदेगटाच्या युवासेनेचे 'अभाविप'शी फाटले; पाठिंबा काढला
6
Pitru Paksha 2024: आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पितृपक्षातील अष्टमीला करा 'गजलक्ष्मी व्रत'!
7
तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; मुख्यमंत्री खोटारडे, त्यांना समज द्या : जगनमोहन रेड्डी
8
ATM Card वर मिळतो १० लाखांपर्यंतचा फ्री इन्शूरन्स; पाहा केव्हा घेता येतो या सुविधेचा लाभ?
9
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
10
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
11
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
12
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
13
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
14
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार
15
सत्यपाल मलिक करणार मविआचा प्रचार; मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची घेतली भेट
16
गुजरातच्या 'गिफ्ट सिटी' सारखे आर्थिक केंद्र आता मुंबईत
17
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
18
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
19
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
20
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप

नांदेड शहरात काँग्रेस-भाजपात रंगले बॅनरयुद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 1:02 AM

नांदेडात अशाप्रकारे पहिल्यांदाच दोन राजकीय पक्षांमध्ये बॅनरयुद्ध रंगल्याचे दिसून येत आहे़

ठळक मुद्देपहिल्यांदाच दोन पक्षांमधील वाद आला बॅनरवर

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: जनसामान्यांचे हाल करणाऱ्या केंद्र आणि राज्य सरकारचा पर्दाफाश करण्यासाठी काँग्रेस पक्षातर्फे काढण्यात आलेल्या जनसंघर्ष यात्रेच्या निमित्ताने शहरात बॅनर लावले होते़ या बॅनरला प्रत्युत्तर म्हणून भाजपाने वेगवेगळ्या वृत्तपत्रांत प्रकाशित झालेल्या बातम्यांचे कात्रण असलेले बॅनर लावले आहे़ त्यावर जोरदार हल्ला करीत काँग्रेसने आणखी बॅनर लावत भाजपावर उपहासात्मक टीका केली़ नांदेडात अशाप्रकारे पहिल्यांदाच दोन राजकीय पक्षांमध्ये बॅनरयुद्ध रंगल्याचे दिसून येत आहे़माजी मुख्यमंत्री तथा प्रदेशाध्यक्ष खा़अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वात राज्यभर भाजपाचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणण्यासाठी काँग्रेसच्या वतीने जनसंघर्ष यात्रा काढण्यात येत आहे़ गुरुवारी ही यात्रा नांदेडात येणार आहे़त्यानिमित्ताने काँग्रेसने शहरभर बॅनर लावले आहेत़ त्या माध्यमातून भाजपावर कडाडून हल्ला चढविण्यात आला आहे़ काँग्रेसने लावलेले हे बॅनर जनसामान्यांचे लक्ष वेधून घेत आहेत़ त्यात आता भाजपानेही त्यापुढेच आपले बॅनर लावले आहे़काँग्रेसला बॅनरच्या माध्यमातून प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न भाजपाकडून करण्यात आला आहे़ त्यामध्ये केलेल्या गटबाजीच्या उल्लेखाबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते़ त्यानंतर दोनच तासांत काँग्रेसने दुसरे बॅनर लावले़ या बॅनरची मात्र दिवसभर चर्चा होती़काँग्रेसने लावलेल्या बॅनर्समध्ये हिटलरचा फोटो टाकला असून देशात गांधी विचाराचा गळा दाबल्याचे नमूद केले़ सरकार दलाल, ज्येष्ठांचे हाल, जनता बेहाल व भाजप नेते मालामाल असा मथळा करण्यात आला होता़ त्यासोबतच यशवंत सिन्हा आणि स्थानिक नेत्या सूर्यकांता पाटील यांनी भाजपाला दिलेल्या घरच्या अहेराच्या बातमीचे कात्रणही टाकण्यात आले होते़ एम.जे.अकबर, राम कदम, बिपिन शर्मा यांच्या अनैतिकतेच्या वर्तनाचा या बॅनर्सवर उल्लेख करतानाच अमित शहा आणि ओवेसी यांची सिक्रेट डील, नोटबंदीनंतर अमित शहांच्या बँकेत जमा झालेले पाचशे कोटी रुपये या बातम्यांचा उल्लेख करीत, भाजपातील लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, एकनाथ खडसे हे कसे अडगळीला गेले़ यावर भाष्य करण्यात आले होते़ काँग्रेस आणि भाजपात रंगलेले हे बॅनरयुद्ध शहरवासियांसाठी मात्र चर्चेचा विषय झाले होते़

टॅग्स :Nandedनांदेडcongressकाँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारण