शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
7
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
8
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
9
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
10
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
11
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
12
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
14
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
15
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
16
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
17
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
18
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
19
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
20
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"

नांदेड जिल्ह्यात चार मतदारसंघात काँग्रेस-भाजपात ‘टस्सल’

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2024 6:00 PM

पाच मतदारसंघात मात्र राष्ट्रीय पक्षाची प्रादेशिक पक्षाशी लढत; वंचित बहुजन पक्षाने जिल्ह्यातील नऊही मतदारसंघात उमेदवार उभे केले आहेत.

नांदेड- काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी हे दोन राष्ट्रीय पक्ष असून नांदेड जिल्ह्यातील ९ मतदारसंघांपैकी तब्बल ४ मतदारसंघात काँग्रेस-भाजप या दोन राष्ट्रीय पक्षात असली टस्सल बघायला मिळणार आहे. भोकर, नायगाव, देगलूर व मुखेड या चार मतदारसंघात हे दोन राष्ट्रीय पक्ष आमने-सामने असून यांच्यात थेट लढत होणार आहे. उर्वरित मतदारसंघात मात्र राष्ट्रीय पक्षाची इतर प्रादेशिक पक्षांशी लढत होणार आहे.

किनवट मतदारसंघात भाजपाचे भीमराव केराम व जिल्ह्यात एकमेव तुतारी चिन्हावर निवडणूक लढवित असलेले उमेदवार प्रदीप नाईक यांच्यात लढत होत आहे. हदगावमध्ये शिंदेसेनेचे बाबुराव कदम व काँग्रेसचे माधवराव जवळगावकर यांच्यात लढत होत आहे. नांदेड उत्तरात मैत्रीपूर्ण लढत होईल. या मतदारसंघात काँग्रेसचे अब्दुल सत्तार, शिंदेसेनेकडून बालाजी कल्याणकर व उद्धवसेनेकडून संगीता पाटील निवडणूक लढवित आहेत. याठिकाणी महाविकास आघाडीचे दोन उमेदवार रिंगणात आहेत. नांदेड दक्षिणमध्ये शिंदेसेनेचे आनंद तिडके व काँग्रेसचे मोहन हंबर्डे यांच्यात सामना रंगणार आहे. याच मतदारसंघात भाजपाचे बंडखोर दिलीप कंदकुर्ते यांचे दोघांनाही तगडे आव्हान असणार आहे. लोह्यात जिल्ह्यातील एकमेव घड्याळ चिन्हावर प्रतापराव चिखलीकर उभे आहेत. उद्धवसेनेकडून एकनाथ पवार तर शेकापकडून आशा श्यामसुंदर शिंदे रिंगणात आहेत.

वंचितचे नऊही मतदारसंघात उमेदवारवंचित बहुजन पक्षाने जिल्ह्यातील नऊही मतदारसंघात उमेदवार उभे केले आहेत. काँग्रेसने किनवट व लोहा मतदारसंघात उमेदवार दिला नाही. किनवटमध्ये प्रदीप नाईक तुतारीवर तर लोह्यात उद्धवसेनेचे एकनाथ पवार मशाल चिन्हावर निवडणूक लढवित आहेत. भाजपाने हदगाव, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण व लोह्यात उमेदवार दिला नाही. हदगाव, नांदेड उत्तर व दक्षिणमध्ये शिंदेसेनेचे उमेदवार रिंगणात आहेत. तर लोह्यात प्रतापराव चिखलीकर घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवित आहेत. बहुजन समाज पार्टीने लोहा, नायगाव व देगलूर मतदारसंघात उमेदवार उभा केला नाही. उर्वरित ६ मतदारसंघात बसपा निवडणूक लढवित आहे. मनसेने केवळ भेकर आणि नांदेड उत्तर मतदारसंघात आपला उमेदवार उभा केला आहे. लोहा, नायगाव व मुखेडमध्ये शेकापचे ३ उमेदवार रिंगणात आहेत.

पक्षांचे उमेदवारकाँग्रेस - ०७भाजप - ०५शिंदेसेना- ०३उद्धवसेना- ०२बीएसपी- ०६वंचित- ०९मनसे- ०२राष्ट्रवादी काँग्रेस- ०१शरदचंद्र पवार- ०१

भोकरश्रीजया चव्हाण- भाजपातिरुपती (पप्पू) कोंढेकर- काँग्रेस

नायगावडॉ. मीनल खतगावकर- काँग्रेसराजेश पवार- भाजपा

देगलूरजितेश अंतापूरकर- भाजपानिवृत्ती कांबळे- काँग्रेस

मुखेडतुषार राठोड- भाजपाहनुमंत पाटील बेटमोगरेकर- काँग्रेस

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेस