शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

नांदेडात काँग्रेसची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2018 12:58 AM

प्रवाशांशी संबंधित रेल्वेच्या सर्वच निर्णयासंदर्भात तसेच नवीन रेल्वे सुरू करताना त्या त्या भागातील खासदारांना विश्वासात घेणे, माहिती देणे, कार्यक्रम पत्रिकांवर नाव टाकणे गरजेचे असताना दम रेल्वेकडून सापत्न वागणूक देत स्थानिक खासदारांना डावलले जात आहे़ याच कारणावरून शुक्रवारी जम्मूतावी एक्स्प्रेसच्या उद्घाटन सोहळ्यात काँग्रेस- भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले होते़

ठळक मुद्देरेल्वेकडून सापत्न वागणूक : काँग्रेस-भाजपाचे कार्यकर्ते आमने-सामने

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : प्रवाशांशी संबंधित रेल्वेच्या सर्वच निर्णयासंदर्भात तसेच नवीन रेल्वे सुरू करताना त्या त्या भागातील खासदारांना विश्वासात घेणे, माहिती देणे, कार्यक्रम पत्रिकांवर नाव टाकणे गरजेचे असताना दम रेल्वेकडून सापत्न वागणूक देत स्थानिक खासदारांना डावलले जात आहे़ याच कारणावरून शुक्रवारी जम्मूतावी एक्स्प्रेसच्या उद्घाटन सोहळ्यात काँग्रेस- भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले होते़नांदेड विभाग मध्य रेल्वेला जोडावा, नांदेड- मुंबई- नांदेड एक्स्प्रेस सुरू करावी यासह विविध मागण्यांचे फलक उंचावत काँग्रेस कार्यकर्त्यांनी रेल्वे प्रशासन व सरकारविरोधात घोषणाबाजीला सुरुवात केली़ यावेळी भाजप कार्यकर्त्यांनीदेखील मोदी मोदी़़़ अशा घोषणा दिल्या़ यावेळी दोन्ही बाजूंकडील कार्यकर्ते आमनेसामने आले होते़ पोलिसांनी लगेच मध्यस्थी करीत कार्यकर्त्यांना दूर केले़नांदेड-जम्मूतावी एक्स्प्रेसला हिरवी झेंडी दाखविण्यासाठी केंद्रीय अन्नप्रक्रिया उद्योगमंत्री हरसिमरत कौर बादल शुक्रवारी नांदेडात आल्या होत्या़ दुपारी रेल्वेस्टेशनवर त्यांचे आगमन होण्यापूर्वीच काँग्रेस कार्यकर्त्यांनी निमंत्रणाच्या वादावरुन आंदोलनाची तयारी केली होती़ मंत्री बादल यांचे रेल्वेस्टेशनवर आगमन होताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी हातात फलक घेत रेल्वे प्रशासन, मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणा दिल्या़ यावेळी किशोर भवरे, विजय येवनकर, उपमहापौर विनय गिरडे, संतोष पांडागळे, शमीम अब्दुला, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पप्पू कोंढेकर, शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे, बालाजी सूर्यवंशी, अब्दुल गफ्फार, विरेंद्रसिंघ गाडीवाले उपस्थित होते़उद्घाटन सोहळ्यास शिरोमणी गुरूद्वारा प्रबंधक समितीचे अध्यक्ष भाई गोबिंदसिंघजी लोगोंवाल, दिल्ली शिरोमणी अकाली दलाचे नेते आ़मनजिंदसिंघ सिरसा, दिल्ली गुरूद्वारा प्रबंधक समितीचे अध्यक्ष मनजितसिंघ जी़ के़, आ़ डी़ पी़ सावंत, महापौर शीला भवरे, गुरूद्वारा बोर्डाचे अध्यक्ष सरदार तारासिंघ, प्रशासकीय अधिकारी डी़ पी़ सिंघ, स़रविंदरसिंघ बुंगई, स़ईकबाल सिंघ, चैतन्यबापू देशमुख, नगरसेविका गुरप्रितकौर सोढी आदी उपस्थित होते़वेळापत्रकावर काँग्रेसची नाराजीजम्मूसाठी रेल्वे सुरू करण्यावर कुणाचाही आक्षेप असण्याचे कारण नाही़ परंतु, मोदी सरकारने यातही राजकारण केले असून केवळ मध्य प्रदेशातील प्रवाशांना फायदा होईल, असे रेल्वेगाडीचे वेळापत्रक बनविले़ निवडणुकीचे राजकारण करणाऱ्या मोदी सरकारने रेल्वे प्रशासनाला हाताशी धरून स्थानिक खासदारांना डावलण्याचा जो उद्योग केला आहे़ तो संतापजनक असून याविरोधात काँग्रेसने आंदोलन केले़ पत्रिकेत खासदारांचे नाव टाकणे हा राजशिष्टाचार असताना त्याचे पालन केले नाही, म्हणून कार्यक्रमस्थळी निदर्शने केली. ते नव्या रेल्वेगाडीसाठीचे नसून रेल्वे प्रशासनाविरोधात असल्याचे सावंत यांनी सांगितले़ सदर राज्यांमध्ये लवकरच निवडणुका होणार असून आचारसंहितेच्या आधी ही गाडी सुरू करून त्या भागातील नागरिकांना खूश करण्याचा मोदी सरकारचा हा डाव असल्याचे आरोप त्यांनी केला़ जम्मूतावी एक्स्प्रेसमध्ये केवळ २५ प्रवाशांनी रिझर्वेशन केले होते़ २२ डबे असलेली वातानुकूलित गाडी विनाप्रवासी धावली़ प्रशासनाने नियोजनपर्ण उद्घाटन केले असते तर निश्चितच शेकडो प्रवाशांना लाभ घेता आला असता़मोदींचा जयघोष़़़काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनीही मोदी मोदीचा जयघोष केला़ यावेळी चैतन्यबापू देशमुख, दिलीपसिंघ सोडी, बालासाहेब बोकारे, संदीप पावडे, विजय गंभिरे, संतोष वर्मा, शितल खांडील, व्यंकट मोकले, अभिषेक सौंदे आदींची उपस्थिती होती़ यावेळी दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते आमनेसामने येवून घोषणाबाजी करीत होते़ त्याचवेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना दूर केले़

टॅग्स :Nandedनांदेडcongressकाँग्रेसrailwayरेल्वे