शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"आपण *** मारायची आणि दुसऱ्याचं..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
4
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
5
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
6
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
7
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
8
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
9
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
10
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
11
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
12
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
13
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
14
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
15
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
16
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
17
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
18
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
19
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
20
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला

नांदेडवर पुन्हा काँग्रेसचा झेंडा

By admin | Published: March 21, 2017 6:42 PM

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आघाडीची घडी नांदेडमधून सुरू झाली, अन् पुन्हा एकदा जिल्हा परिषदेवर काँग्रेसने आपले वर्चस्व कायम

धर्मराज हल्लाळे /ऑनलाइन लोकमतनांदेड, दि. 21 -  काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आघाडीची घडी नांदेडमधून सुरू झाली, अन् पुन्हा एकदा जिल्हा परिषदेवर काँग्रेसने आपले वर्चस्व कायम राखले. बदलत्या परिस्थितीतही जिल्हा परिषदेत काँग्रेसच्या जागा वाढलेल्या नांदेडने सातत्याने काँग्रेसच्या बाजूने कौल दिला आहे. नगरपालिका निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेच्या रणधुमाळीकडे सर्वांचेच लक्ष होते. सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी अध्यक्षपद सुटल्याने प्रत्येक पक्षात तुल्यबळ दावेदार सांगितले जात होते. प्रचारादरम्यान आघाडीत बिघाडी झाली, युतीही तुटली. त्यामुळे निकालानंतर कोण कोणासोबत जाणार याचे तर्कवितर्क लढविले गेले. जिल्हा बँकेत काँग्रेसविरुद्ध सर्व असे चित्र होते. त्याची आठवण करून दिली जात होती. परंतु माजी मुख्यमंत्री खा.अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने २५ वरून २८ जागांवर मजल मारली. सर्वत्र सत्ता परिवर्तन तसेच केंद्र व राज्यातील सत्तेच्या बाजूने कौल मिळत असतानाही नांदेडच्या जनतेने मात्र काँग्रेसची साथ जिल्हा परिषद निवडणुकीतही सोडली नाही. जिल्ह्यात ११ नगराध्यक्ष काँग्रेसचे आहेत़ विधानपरिषदेचा निकालही ताजाच होता. यासर्व पार्श्वभूमीवर विरोधकांना रान पेटवूनही यशाच्या जवळ जाता आले नाही. निकालानंतर काँग्रेस २८, राष्ट्रवादी १०, भाजपा १३, शिवसेना १०, रासप १ व अपक्ष एक असे संख्याबळ समोर आले. राज्यपातळीवर काँग्रेस व राष्ट्रवादीने आघाडीची भूमिका घेतली. त्याची सुरुवात नांदेडमधून झाली. दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा़ शरद पवार यांना भेटलेल्या भाजपा सेना नेत्यांना अनुकूल शब्द मिळाला नाही. जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आ. प्रदीप नाईक व माजी आ. शंकर अण्णा धोंडगे या दोघांनीही समविचारी पक्षाबरोबर जाण्याचा म्हणजेच काँग्रेसला साथ देण्याचा सूर प्रारंभापासून लावला होता. माजी आमदार व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बापुसाहेब गोरठेकर यांचेही पक्षातील नेत्यांनी मन वळविले. माजी मुख्यमंत्री चव्हाण व पक्षनिरीक्षक आ. सतीश चव्हाण यांनी आघाडीची घोषणा केली. त्यामुळे बहुमताचा आकडा ओलांडला. त्यात रासपा व एका अपक्ष उमेदवाराची भर पडल्याने सत्ताधारी आघाडीकडे ६३ पैकी ४० असे भक्कम संख्याबळ झाले. नगरपालिका निवडणुक यशापाठोपाठ जिल्हा परिषदेवरील आपली सत्ता अबाधित ठेवणाऱ्या काँग्रेसची पकड आणखी मजबूत झाली आहे. माजी आ. जवळगावकर यांच्या मातोश्री शांताबाई पवार जवळगावकर यांना अध्यक्षपद देवून जिल्हा परिषदेचा कारभार अनुभवी खांद्यावर टाकला आहे. त्याचवेळी आ. नाईक यांच्या स्पष्ट भूमिकेला साथ मिळाल्याने उपाध्यक्षपदी समाधान जाधव विराजमान झाले आहेत.