भोकर विधानसभेत काँग्रेसला तर भाजपला भोकर तालुक्यात आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 12:16 AM2019-05-26T00:16:03+5:302019-05-26T00:17:33+5:30

लोकसभा निवडणुकीच्या निकालात काँग्रेसला भोकर विधानसभा मतदारसंघात मतदारांनी ५ हजार मतांची तर भोकर तालुक्यातून भाजपला ५ हजार मतांची आघाडी दिली आहे.

Congress lead in Bhokar assembly and BJP in Bhokhar tehasil | भोकर विधानसभेत काँग्रेसला तर भाजपला भोकर तालुक्यात आघाडी

भोकर विधानसभेत काँग्रेसला तर भाजपला भोकर तालुक्यात आघाडी

googlenewsNext
ठळक मुद्दे२०१० मध्ये सव्वा लाखांचे मताधिक्य। यावेळी मताधिक्य घटले

भोकर : लोकसभा निवडणुकीच्या निकालात काँग्रेसला भोकर विधानसभा मतदारसंघात मतदारांनी ५ हजार मतांची तर भोकर तालुक्यातून भाजपला ५ हजार मतांची आघाडी दिली आहे.
भोकर विधानसभेच्या आकडेवारीनुसार झालेल्या मतदानात काँग्रेस ८५ हजार, भाजप ८० हजार तर वंचित आघाडी २६ हजार मते मिळाली. यात विशेष म्हणजे भोकर तालुक्यातून काँग्रेसला २९ हजार, भाजपाला ३५ हजार तर वंचित आघाडीला ७६०० मते मिळाली. तसेच भोकरची पालिका ताब्यात असूनही शहरातून फक्त २३०० मताधिक्याच्या पलीकडे काँग्रेसला जाता आले नाही.
मागील दशकात स्थानिक पातळीवरील ज्या लोकप्रतिनिधींना महत्त्वाची पदे मिळाली त्यांच्या भागातही कमालीचे मतदान घटले आहे. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी मोठी कसरत करुन जनसामान्यांचा विश्वास संपादन करण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे.
याच मतदारसंघाने सन २०१० मध्ये १ लाख २० हजारांचे मताधिक्य देवून अशोकराव चव्हाणांना मुख्यमंत्री केले होते. काँग्रेसच्या पराभवाला वंचित बहुजन आघाडीला जबाबदार धरण्यात येत असलेतरी प्रत्यक्षात तालुक्यातील सिंचनाचा व रोजगाराचा महत्त्वाचा प्रश्न सोडवता आला नाही. तसेच पक्षांतर्गत नाराजी व जातीपातीच्या राजकारणाचा सामना करावा लागून कार्यकर्त्यांना वाटाही मिळाला नाही.
विविध आरोप
काँग्रेस पक्षांतर्गत झालेली गटबाजी, नाराजी आणि काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या मनमानी कारभारावरुन विविध आरोपांना वाव दिल्याने जनसामान्यांत काँग्रेसबद्दलची भावना बदलत गेली. याचा राग लोकसभा निवडणुकीच्या मतपेटीतून मतदारांनी व्यक्त केल्याने बहुमतातील काँग्रेसला अल्पमतात येण्याची वेळ आली.

Web Title: Congress lead in Bhokar assembly and BJP in Bhokhar tehasil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.