काँग्रेस कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर सत्ता परिवर्तनाची नांदी ठरावी : अशोकराव चव्हाण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 06:23 PM2019-02-06T18:23:38+5:302019-02-06T18:24:19+5:30

काँग्रेस पक्षाने मागील साठ वर्षात सर्वच आघाड्यांवर देशाला प्रगतीपथावर नेले आहे.

Congress workers training camp should be the starting point for change of power: Ashokrao Chavan | काँग्रेस कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर सत्ता परिवर्तनाची नांदी ठरावी : अशोकराव चव्हाण 

काँग्रेस कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर सत्ता परिवर्तनाची नांदी ठरावी : अशोकराव चव्हाण 

Next

नांदेड : काँग्रेस पक्षाने मागील साठ वर्षात सर्वच आघाड्यांवर देशाला प्रगतीपथावर नेले आहे. विकासाचा रथ वेगाने पुढे जात असताना खोटी आश्वासनं देणारे मोदी सरकार सत्तेत आले आणि देश पुन्हा एकदा गरीबी व अन्य प्रश्‍नांच्या खाईत लोटला आहे. त्याला बाहेर काढण्यासाठी व लोकांपर्यंत काँग्रेसचा विचार रुजविण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांचे जिल्हानिहाय प्रशिक्षण आयोजित केले असून हे प्रशिक्षण सत्ता परिवर्तनाची नांदी ठरावी, असे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांनी आज येथे केले.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्यावतीने सध्या राज्यभर जिल्हानिहाय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून त्याअनुषंगाने सलग दुसर्‍या दिवशी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकार्‍यांना प्रशिक्षित करण्यात आले. दिवसभर चाललेल्या या शिबिराचे उद्घाटन खा.अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. 

पुढे बोलताना खा.चव्हाण म्हणाले की, लोकांचा वाढलेला काँग्रेसमधील जोश आता मतात रूपांतरीत करण्याची कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे. आपण खूप केले आहे, पण सांगण्यासाठी कमी पडतो. त्यासाठी अशा प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. आपल्याला कोणत्याही परिस्थितीत देश आणि राज्य वाचविण्यासाठी सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी निवडणुका जिंकणे गरजेचे आहे. जनता शासनावर नाराज आहे. अशावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपापल्या भागात जाऊन काँग्रेसचा विचार प्रभावीपणे सांगितला पाहिजे, असे मार्गदर्शन केले. 

या प्रशिक्षण शिबिरात जिल्हा परिषद, महानगरपालिका, पंचायत समित्या, नगरपालिका, नगरपंचायती, बाजार समितीचे संचालक, सहकारी साखर कारखान्याचे संचालक, जिल्हा बँकेचे संचालक, मजूर फेडरेशनचे संचालक, संपूर्ण शहर व जिल्हा कार्यकारिणी, ब्लॉग काँग्रेसचे अध्यक्ष, विविध फ्रंटलचे पदाधिकारी यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.

Web Title: Congress workers training camp should be the starting point for change of power: Ashokrao Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.