शहरं
Join us  
Trending Stories
1
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
2
सनातन धर्माची रक्षा करणे ही आमची जबाबदारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान  
3
'पृथ्वीवरील सर्व खोटारडे मेले, तेव्हा राहुल गांधींचा जन्म झाला', शिवराज सिंह यांची बोचरी टीका
4
...म्हणून माजी सैनिकाने १४ दिवसांपासून डीप फ्रिजरमध्ये ठेवलाय मुलाचा मृतदेह, समोर आलं धक्कादायक कारण
5
IPL संघाच्या मालकाने खरेदी केला इंग्लडचा क्रिकेट क्लब; कोट्यवधींचा झाला व्यवहार
6
चमचम करता है नशीला बदन.... युजवेंद्र चहलची पत्नी धनश्रीचा 'स्पेशल' लूक, पाहा Photos
7
कोल्हापूरमधील मुरगूड येथे शिक्षकाने प्राध्यापिका पत्नीचा केला खून, समोर आलं धक्कादायक कारण
8
राहुल गांधींनी गोहाना जिलेबीची चव चाखली; काय आहे तिची खासियत?
9
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
10
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
11
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
12
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
13
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
14
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
15
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
16
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
17
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ
18
माझा पुढचा जन्म 'या' राज्यातच व्हावा, अशी माझी इच्छा आहे; धीरेंद्र शास्त्री यांचं विधान
19
"लेबनानमधील पेजर हल्ला हा इस्रायलचा 'मास्टरस्ट्रोक', भारतात जर असा प्रयत्न झाला तर..."
20
हरियाणा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला धक्का; कोर्टाचा आदेश, "आत्मसमर्पण करा, अन्यथा..." 

इंधन दरवाढीविरोधात कॉंग्रेसचा हल्लाबोल; भरपावसात अशोकराव चव्हाणांच्या नेतृत्वात बैलगाडी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 1:16 PM

इंधन दरवाढ व महागाई विरोधात जनतेचा आवाज मोदी सरकारच्या कानावर पडावा व केंद्र शासनाने याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा यासाठी राज्यभर काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहेत.

ठळक मुद्देपाऊस सुरू असतानाही कार्यकर्त्यांनी उस्फुर्त सहभाग नोंदवला.मोर्चात बैलगाड्यांची संख्या लक्षणीय होती.

नांदेड : सातत्याने होणा-या इंधन दरवाढ व महागाईच्या  विरोधात गुरूवारी काँग्रेसच्यावतीने बैलगाडी अन सायकल मोर्चा काढण्यात आला. जुना मोंढा येथून निघालेल्या मोर्चाचे नेतृत्व जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केले.

इंधन दरवाढ व महागाई विरोधात जनतेचा आवाज मोदी सरकारच्या कानावर पडावा व केंद्र शासनाने याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा यासाठी राज्यभर काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहेत. गुरुवारी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वात बैलगाडी व सायकल मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते. जुना मोंढा येथून मोर्चास सुरुवात झाली, पाऊस सुरू असतानाही कार्यकर्त्यांनी उस्फुर्त सहभाग नोंदवला. बैलगाड्यांची संख्या लक्षणीय होती. मोंढ्यातून निघालेल्या मोर्चात सहभागी कार्यकर्त्यांनी मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी केली. सदर मोर्चा महावीर चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. 

मोर्चाच्या सांगता कार्यक्रमात अशोकराव चव्हाण यांनी आंदोलनकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी महानगराध्यक्ष आ. अमरनाथ राजूरकर, माजी पालकमंत्री डी.पी.सावंत, आ.मोहनअण्णा हंबर्डे, आ. माधवराव पाटील जवळगावकर, जि.प. अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, महापौर मोहिनीताई येवनकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण, माजी आ.हनमंत पाटील बेटमोगरेकर, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पप्पू कोंढेकर, शहर जिल्हाध्यक्ष डाॅ. विठ्ठल पावडे, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा कविता कळसकर, शहराध्यक्षा अऩुजा तेहरा, ब्लाॅक काँग्रेसचे अध्यक्ष किशोर स्वामी, विनोद कांचनगिरे, युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष अब्दुल गफार, सत्यजित भोसले आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :congressकाँग्रेसNandedनांदेडagitationआंदोलन