शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

बांधकाम साहित्याने रस्ते व्यापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 4:17 AM

आधार नोंदणी बंद असल्याने अडचण देगलूर - शहरातील विविध आधार केंद्रावर नवीन नोंदणी तसेच आधारमध्ये माहिती अपडेट करण्याची प्रक्रिया ...

आधार नोंदणी बंद असल्याने अडचण

देगलूर - शहरातील विविध आधार केंद्रावर नवीन नोंदणी तसेच आधारमध्ये माहिती अपडेट करण्याची प्रक्रिया बंद आहे. यामागे कोरोनाचे कारण सांगितले जाते. शहरातील विविध भागात नागरिक फिरून चौकशी करतात. मात्र केंद्र बंद असल्याने लोकांची अडचण होत आहे.

फूल उत्पादकांना लॉकडाऊनचा फटका

मुदखेड - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुदखेड शहरासह तालुक्यात फूल शेती करणाऱ्या जवळपास ८०ते १००फूल उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. लॉकडाऊनमुळे बाजारपेठ बंद असल्याने फुले विक्रीसाठी नेता येत नसल्याने जागेवरच सुकून जात आहेत. त्यामुळे फूल उत्पादकांचे मोठे नुकसान होत आहे. फूल उत्पादकांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी होत आहे.

बँकेतील गर्दी कमी होईना

कंधार - मागील महिन्यात तब्बल १० दिवस बँका बंद ठेवण्यात आल्या होत्या. परंतु काही दिवसांपासून पुन्हा ठरावीक वेळेत बँका सुरू झाल्याने ग्राहकांची गर्दी वाढली आहे. या दरम्यान कोरोनाचे नियम पाळले जात नसल्याने कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

खरिपाची तयारी सुरू

उमरी - तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी सुरू केली आहे. यावर्षी खरीप हंगामात सोयाबीन, कापूस, तूर, मूग आदी पिके घेण्याचे नियोजन केले जात आहे.

मास्क विक्रीतून रोजगार

भोकर - शहरात मास्कची मागणी वाढली असून अनेकांनी मास्क विक्रीचा व्यवसाय सुरू केला. सध्या किरकोळ विक्रेत्यांच्या हाताला काम नसल्याने या विक्रेत्यांनी मास्क खरेदी करून शहरातील विविध भागात स्टॉल्स लावले आहेत.

जागेच्या वादातून मारहाण

नायगाव - तालुक्यातील निळगव्हाण येथील भारतबाई गागलवाड यांना जागेच्या वादातून आरोपींनी मारहाण केल्याची घटना ९ मे रोजी घडली. यामध्ये भारतबाई यांच्या डोक्याला मार लागला असून आरोपींनी त्यांना जिवे मारण्याचीही धमकी दिली. नायगाव पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

बियाणांची चढ्या दराने विक्री

बिलोली - येथील बाजारपेठेत बियाणांची चढ्या दराने विक्री केली जात आहे. शेतकरी मशागत करून खरीप हंगामाची तयारी करीत असून बी-बियाणे, खतांच्या खरेदीचे नियोजनही करत आहेत. मात्र काही व्यापाऱ्यांनी आतापासूनच चढ्या दराने विक्री करणे सुरू केले असून यामुळे शेतकरी लुबाडला जात आहे.

गटई कामगारांना मदत द्या

नायगाव - लॉकडाऊनच्या काळात चर्मकार समाजातील गटई कामगारांची मोठ्या प्रमाणात उपासमार होत आहे. राज्यातील गटई कामगारांना प्रत्येकी १० हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी अखिल भारतीय गुरू रविदास समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष गंगाधरराव गंगासागरे यांनी केली. यानिमित्ताने उपोषणही करण्यात आले. यावेळी बंटी नायगावकर, संतोष सूर्यवंशी, गजानन गंगासागरे, चंद्रकांत हवेलीकर, देवानंद गंगासागरे आदी उपस्थित होते.

सार्वजनिक विहिरीची दुरावस्था

कंधार - उस्माननगर येथील वाॅर्ड ३ व २ मधील गवळी गल्ली भागातील सार्वजनिक विहिरीची दयनीय अवस्था झाली. निजामकालीन विहीर आहे. विहिरीची उंची व रस्ता बरोबर झाल्याने अनेक दुर्घटना होत आहेत. डुक्कर, शेळी विहिरीमध्ये पडून जखमी झाले आहेत. या विहिरीचे पाणी धुणी, भांडीसाठी वापरले जाते. पावसाळा-हिवाळ्यात भरपूर पाणी असते.

तीरकमटे यांना पीएच.डी.

देगलूर - आडत व्यापारी शिक्षण संस्था संचलित देगलूर महाविद्यालयातील लोकप्रशासन संशोधन केंद्रातील विद्यार्थी एन.टी. तीरकमटे यांना पीएच.डी. प्रदान करण्यात आली. त्यांनी लोकप्रशासन विभाग प्रमुख डॉ.बी.आर. कत्तुरवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शासनाचे जलयुक्त शिवार अभियान विशेष संदर्भ लातूर जिल्हा या विषयावर संशोधन पूर्ण केले. याबद्दल त्यांना पीएच.डी. देण्यात आली.

पिकांचे पंचनामे करा

किनवट - वादळी वारे आणि पावसामुळे दोन दिवसापूर्वी पिकांचे मोठे नुकसान झाले. महसूल प्रशासनाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावेत, अशी मागणी किनवट पंचायत समितीचे उपसभापती कपिल करेवाड यांनी केली. शिवणी परिसरातील नुकसानीकडे त्यांनी लक्ष वेधले. लोकांच्या घरावरील टीनपत्रे उडाल्याचेही त्यांनी नमूद केले.

गव्हाचे भाव वाढले

हदगाव - मागील वर्षीच्या तुलनेत गव्हाचे भाव २०० ते २५० रुपये वाढले आहेत. यंदा २४०० ते २२०० रुपयांपर्यंत गहू विक्री होत आहे. लॉकडाऊनमुळे अनेक व्यापारी भाववाढ करीत असल्याचे दिसून येते.

रस्त्यावर शुकशुकाट

नायगाव - लॉकडाऊनमुळे कृृष्णूर परिसरातील रस्त्यावर तुरळक गर्दी दिसत आहे. सकाळी ७ ते ११ दरम्यान अत्यावश्यक सेवा सुरू असली तरी रस्त्यावर तुरळक गर्दी आहे. ऊन व लॉकडाऊनमुळे नागरिक घराबाहेर पडत नसल्याचे दिसते.

उघड्यावर खाद्यपदार्थ विक्री

नांदेड - येथील रेल्वे स्टेशनसमोर उघड्यावरच खाद्य पदार्थांची विक्री करण्यात येत असल्यामुळे आरोग्य धोक्यात आले आहे. येथे डासांसह माशांचाही प्रादुर्भाव वाढला. कोणतीही सुरक्षा बाळगली जात नाही. याशिवाय बसेसही धावत असल्यामुळे रस्त्यावरील धूळ खाद्यपदार्थांवर उडत आहे. संबंधित याकडे दुर्लक्ष करीत आहेत.