भोकर (नांदेड) : तालूक्यात रविवारी रात्रीपासून पावसाची संततधार सुरु असून मोघाळी मंडळात अतिवृष्टी झाली आहे. संततधार पावसामुळे कपाशीचे पीक धोक्यात आले आहे.
मागील आठवड्यात रिमझिम पावसाने तालुक्यात सुरुवात झाली. रविवारी रात्री जोरदार पाऊस झाला. मात्र, संततधार पावसामुळे यामुळे खरीप हंगामातील पीके धोक्यात आली आहेत. विशेतः कापूस पीक उन्मळून पडत असल्याने शेतकरी वर्गातून चिंता व्यक्त होत आहे.
तालुक्यात मंडळनिहाय आज सकाळपर्यंत झालेल्या पावसाची नोंद पुढील प्रमाणे, (कंसात आतापर्यंत झालेला पाऊस)भोकर - ३४ (७५४), मोघाळी - ७५ (९९५), मातुळ - ३३ (७१२), किनी - ३२ (८३४) मि.मी. अशाप्रकारे एकूण १७४.०० (३२९५) मि.मी. तर सरासरी पाऊस - ४३.५० मि.मी. एवढा झाला आहे. हंगामात एकूण सरासरी ८२३.७५ मि.मी. पाऊस झाल्याने तालूक्यातील सरासरी पर्जन्यमानाच्या ८२.७१ टक्के पावसाची नोंद करण्यात आल्याची माहिती महसूल विभागाने दिली आहे.