विद्यापीठाशी सर्व संलग्नित महाविद्यालयातील ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा विभागाच्या ३ डिसेंबर २०२० रोजीच्या परिपत्रकानुसार आपापल्या महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर केलेला आहे, अशा विद्यार्थ्यांचे पदवी प्रमाणपत्र २६ ऑगस्ट २०१९ रोजीच्या परिपत्रकानुसार महाविद्यालय स्तरावर आयोजित करण्यात येणाऱ्या पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभामध्ये वितरित करण्यात येणार आहेत. त्यामुळे संलग्नित प्राचार्यांनी त्यांच्या महाविद्यालयात घेण्यात येणाऱ्या पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभाची सूचना सर्व विद्यार्थ्यांना अवगत करून द्यावी, असे निर्देशही विद्यापीठाच्या प्रशासनाने दिले आहेत.
चौकट-----------
दीक्षांत समारंभामध्ये सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थी व पीएच.डी. पदवी प्राप्त विद्यार्थ्यांनाच पदवी प्रमाणपत्र प्रमुख अतिथींच्या हस्ते वितरित करण्यात येणार आहे. सदर विद्यार्थ्यांनी ४ मे रोजी सकाळी ८.३० ते ९.३० दरम्यान आपल्या उपस्थितीची नोंद समन्वय विभाग, प्रशासकीय इमारत (तळ मजला) व पदव्युत्तर विभाग (पीजी सेक्शन) येथे करणे आवश्यक आहे. दीक्षांत समारंभामध्ये उपस्थित राहून पदवी-पदविका ग्रहण करणाऱ्या विद्यार्थ्यांनी पांढरा पायजमा-पॅन्ट व पांढरा ब्लाऊज किंवा पांढऱ्या रंगाच्या ओढणीस पांढरा पंजाबी ड्रेस परिधान केलेला असावा, असे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने म्हटले आहे.