चौकट- एसीच्या किंमतीही आवाक्यात आल्याने आता रूम एसी, विन्डो एसी, टेबल व विन्डो कुलरदेखील उपलब्ध झाले आहेत. मध्यमवर्गीयांकडून एसीला मागणी येत होती. एसीला वीज जास्त लागते हा समज आता कमी झाल्यामुळे तसेच नवीन तंत्रज्ञानानुसार वीजबचत असल्याने एसी खरेदीला प्राधान्या दिले जाते. मात्र गेल्या महिनाभरापासून हा व्यवसायही ठप्प झाला आहे.
चौकट- जानेवारी महिन्यापासून नागरिकांचा एअरकंडिशन खरेदीकडे कल वाढला होता. नवीन तंत्रज्ञानामुळे वीज बिल अगदी कमी आणि सर्वसामान्यांना परवाडणार्या ब्रँडेडचे नवे एसी उपलब्ध आहेत. मात्र कोरोनामुळे नागरिक आता एसी घेत नाहीत. अति थंड वातावरणामुळे सर्दी होण्याची भीती त्यांना वाटत आहे. त्यामुळे या व्यवसायावर यंदाही गतवर्षी सारखाच परिणाम झाला आहे. - जगदीश शर्मा, एअरकंडिशन विक्रेते.
चौकट- यंदा कुलरची मागणी वाढली होती. गतवर्षीचे नुकसान भरून निघेल अशी अपेक्षा होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कुलरची निर्मिती करण्यात आली होती. काहींनी ॲडव्हान्स बुकिंग केले होते. मात्र आता ब्रेक द चेन मुळे दुकाने बंद ठेवावे लागत असून कुलर विक्रीवर मोठा परिणाम झाला आहे. - चांदभाई, कुलर विक्रेते.