मयतामध्ये पावडेवाडी नाका येथे ९२ वर्षीय पुरुष, नायगाव येथील ४१ वर्षीय महिला, हदगाव येथील ६५ वर्षीय पुरुष, लोहा येथील बळीराजा मार्केटमधील ५० वर्षीय पुरुष, नांदेडमधील ज्ञानेश्वरनगर येथील ६२ वर्षीय महिला, मुदखेड तालुक्यातील ५५ वर्षीय महिला, नांदेडमधील गाडीपुरा येथील ५४ वर्षीय महिला, तरोडा येथील ६१ वर्षीय पुरुष, जुनामोंढा येथील ९० वर्षीय महिला, वजिराबाद येथील ४५ वर्षीय पुरुष, मुखेड तालुक्यातील सावरगाव येथील ५० वर्षीय पुरुष, भावसार चौकातील ६५ वर्षीय पुरुष, नायगाव तालुक्यातील कुंटूर येथील ६० वर्षीय महिला, नांदेडमधील विकासनगर येथील ४२ वर्षीय पुरुष, वजिराबाद येथील ६० वर्षीय महिला, अंबेकरनगरातील ७५वर्षीय पुरुष, लोहा तालुक्यातील किवळा येथील ६६ वर्षीय महिला, नांदेडमधील साईनगरातील ५५ वर्षीय पुरुष, नायगाव तालुक्यातील मांजरम येथील ९८ वर्षीय पुरुष, लोहा तालुक्यातील वडज येथील ६५ वर्षीय महिला, नांदेडमधील पवननगरातील ८० वर्षीय पुरुष, हडको येथील ४८ वर्षीय महिला, भोकर तालुक्यातील बल्लाळ येथील ६५ वर्षीय पुरुष आणि तरोडा नाका येथील ६५ वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे ७९४ जणांचा मृत्यू झाला आहे.
बुधवारी आढळलेल्या १ हजार ७९ रुग्णांमध्ये आरटीपीसीआर तपासणीत नांदेड मनपा क्षेत्रातील २९५, नांदेड ग्रामीण १३, भोकर १०, देगलूर ६, हिमायतनगर ४१, लोहा ३५, किनवट १३, नायगाव १६, कंधार १४, बिलोली ५, हदगाव १, मुखेड ८, हिंगोली १, लातूर १, अकोला जिल्ह्यातील एक रुग्ण आढळला आहे.
जिल्ह्यात बुधवारी ८५४ जणांना कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. त्यात मनपाअंतर्गत गृहविलगीकरण व एनआरआय येथील ५६२, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटलमधील १५ रुग्ण, मुखेड २७, हिमायतनगर २०, धर्माबाद २०, उमरी २१, हदगाव ३४, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय ६, भोकर १०, कंधार २७, माहूर ७, अर्धापूर १८ आणि खासगी रुग्णालयातील ८७ रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात सध्या १० हजार १५७ रुग्णावर उपचार सुरू आहेत. त्यातील १७२ जणांची प्रकृती अति गंभीर बनली आहे.