शनिवारी २७ रुग्णांचा कोरोनाने मृत्यूही झाला आहे. त्यामध्ये नांदेडमधील प्रभातनगर येथील ७४ वर्षीय महिला, अर्धापूरमधील ५८ वर्षीय महिला, लोहा तालुक्यातील माळाकोळी येथील ७१ वर्षीय पुरुष, इतवारा नांदेड येथील ६६ वर्षीय पुरुष, चैतन्यनगर येथील ६४ वर्षीय महिला, पुणेगावातील ६५ वर्षीय पुरुष, मुदखेड तालुक्यातील इजळी येथील ८५ वर्षीय महिला, सिडकोतील ५७ वर्षीय पुरुष, चैतन्यनगर येथील ३५ वर्षीय महिला, नायगाव येथील ७४ वर्षीय महिला, धनेगाव येथील ४६ वर्षीय पुरुष, तेहरानगर येथील ३५ वर्षीय पुरुष, उमरी येथील ३० वर्षीय पुरुष, खडकपुरा येथील ७० वर्षीय पुरुष, नांदेडमधील ७५ वर्षीय पुरुष, मंंत्रीनगरातील ७४ वर्षीय पुरुष, देगलूर मधील गोकुळनगर मधील ५० वर्षीय पुरुष, देगलूर तालुक्यताील सुगाव येथील ५८ वर्षीय पुरुष, कोत्तेकल्लूर येथील ६४ वर्षीय पुरुष, हिमायतनगर तालुक्यातील चाकरी येथील ६५ वर्षीय महिला, हदगाव तालुक्यातील रुई धानोरा येथील ५०वर्षीय पुरुष, मुखेड तालुक्यातील निवळी येथील ६५ वर्षीय महिला, किनवट येथील ६५ वर्षीय महिला, जुना कौठा नांदेड येथील ७९ वर्षीय पुरुष, नायगाव तालुक्यातील हंगरगा येथील ७९ वर्षीय पुरुष, देगलूर तालुक्यातील वझर येथील ५५ वर्षीय पुरुष आणि कौठा नांदेड येथील ८३ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
जिल्ह्यात सध्या ११ हजार ६८७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यातील १८९ रुग्णांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यात बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७६.७० टक्क्यावर पोहचले आहे.
शनिवारी १,३१४ कोरोना बाधित रुग्ण बरे झाल्यानंतर घरी परतले आहेत. त्यात सर्वाधिक मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरणातून ८७० रुग्ण बरे झाले आहेत. विष्णूपुरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील २०, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल १७, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय २०, मुखेड ४१, हदगाव १८, माहूर ३, बिलोली ३४, लोहा ३८, नायगाव ४७, धर्माबाद १०, अर्धापूर १९, हिमायतनगर २४, किनवट २४, कंधार ४ आणि खासगी रुग्णालयातील १२५ रुग्णांचा त्यात समावेश आहे.