चौकट...........
१५ बाधितांची प्रकृती गंभीर
सद्यस्थितीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २६, जिल्हा रुग्णालय १९, जिल्हा रुग्णालय नवीन इमारत २०, मुखेड १३, देगलूर १६, हदगाव ९, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरणात १२८, नांदेड तालुकाअंतर्गत ४८, औरंगाबाद येथे संदर्भित १ तर खाजगी रुग्णालयात १९ अशा एकूण २९९ जणांवर उपचार सुरु असून त्यातील १५ जणांची प्रकृती गंभीर आहे.
लग्न सोहळे, बाजार पेठेतील गर्दी टाळा
ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा अवतार पुढे आला आहे. हा कोरोना पुर्वीच्या आजाराच्या तुलनेत ७० पट अधिक वेगाने प्रादुर्भाव करणारा असल्याचे पुढे आल्यानंतर राज्यातील यंत्रणाही अलर्ट झाली आहे. मात्र त्यानंतरही लग्न सोहळे आणि बाजार पेठेत नागरिक कुटूंबियांसह मोठी गर्दी करीत असल्याचे चित्र आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी गर्दी टाळण्याची आवश्यकता आहे.