जिल्ह्यात एमओ ६३१, परिचारिका एक हजार ४८९, आशा एक हजार ५३०, अंगणवाडी वर्कर पाच हजार ६३२, एमपीडब्ल्यू एक हजार ८४५, फ्रंटलाइन वर्कर दोन हजार ९५७, पॅरामेडिकल एक हजार ३२३, मदतनीस एक हजार ३०२, कारकून ३९० अशा एकूण १७ हजार ९९ जणांना ही लस देण्यात येणार आहे. आता पहिला डोस दिल्यानंतर २८ दिवसांत दुसरा डोस देण्यात येणार आहे. २ ते ८ डिग्री तापमानात ही लस साठविण्यात आली आहे.
चौकट- लसीकरणानंतर त्रास झाल्यास लगेच उपचार
लसीकरणानंतर काही वेळेस रुग्णांना त्रास होतो. त्यासाठी प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून तातडीने उपचार मिळावेत, यासाठी केंद्रे स्थापन केली आहेत. त्यात डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, एसजीजीएस रुग्णालय, हैदरबाग, उपजिल्हा रुग्णालय देगलूर, गोकुंदा, हदगाव, मुखेड, ग्रामीण रुग्णालय बारड, भोकर, हिमायतनगर, मुदखेड, उमरी, बिलोली, धर्माबाद, मांडवी, लोहा, कंधार आणि नायगाव यासह नारायण रुग्णालय, लोट्स हॉस्पिटल, अश्विनी रुग्णालय, लाइफ केअर, तिरुमला आणि रेणुकाई हॉस्पिटल या खाजगी रुग्णालयांंत रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. याचा नियमित लसीकरणावर कोणताही परिणाम होणार नाही.