जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंतचा सर्वाधिक ९४७चा आकडा शनिवारी होता. रविवारी त्यात थोडी कमी झाली असून, ९२७ रुग्ण आढळले आहेत. रविवारी ७ पुरुषांचा आणि २ महिला रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यातील ५ रुग्ण हे जिल्हा कोविड हॉस्पिटलमध्ये तर एक रुग्ण विष्णुपुरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणि तीन रुग्णांचा मृत्यू खासगी रुग्णालयात झाला आहे.
रविवारच्या अहवालात आरटीपीसीआर तपासणीत नांदेड मनपा क्षेत्रात २२२, माहूर १८, नायगाव ८, मुखेड ३०, धर्माबाद २३, मुदखेड १, हिंगोली २, नांदेड ग्रामीण ११, अर्धापूर १४, देगलूर २९, किनवट २, लोहा ३७, हदगाव २ आणि परभणी जिल्ह्यातील २ रुग्ण बाधित आढळले. अँटिजन तपासणीतही नांदेड मनपा क्षेत्रात २२३, अर्धापूर २७, बिलोली ७, धर्माबाद १८, कंधार २४, लोहा ६०, मुदखेड ६, नायगाव १३, परभणी १, नांदेड ग्रामीण २७, भोकर १४, देगलूर ४, हदगाव ११, किनवट ३८, माहूर २२, मुखेड २७, उमरी ३ आणि नागपूर जिल्ह्यात एक रुग्ण सापडला.
जिल्ह्यात रविवारी झालेल्या ९ मृत्युंमध्ये देगलूर तालुक्यातील भक्तपूर येथील ६५ वर्षीय पुरुष, अर्धापूर तालुक्यातील बारसगाव येथील ५४ वर्षीय पुरुष, नांदेडमधील सरपंचनगर येथील ६१ वर्षीय पुरुष, नांदेड येथील नसरतपूर रोडवरील ४५ वर्षीय पुरुष, भूविकास कॉलनीतील ७५ वर्षीय पुरुष, रामनगरातील ४९ वर्षीय महिला, होळी, सराफा भागातील ७३ वर्षीय महिला, दीपनगरातील ६२ वर्षीय पुरुष आणि लोहा तालुक्यातील कलंबर येथील ७५ वर्षीय पुरुषाचाही समावेश आहे.
३०९ जणांनी कोरोनावर मातही केली आहे. त्यात नांदेड मनपा क्षेत्रातील २२०, विष्णुपुरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ५, किनवट ७, बिलोली ३, धर्मबाद ४, जिल्हा रुग्णालय २२, देगलूर ३, भोकर २, मुदखेड ३ आणि खासगी रुग्णालयातील ४० रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात ५ हजार ३७७ रुग्णांवर उपचार सुरू आहे. त्यातील ५९ जणांची प्रकृती अतिगंभीर आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी १९०, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटलमध्ये ७९, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नवी इमारत ११९, किनवट ६३, मुखेड १०६, देगलूर १९, हदगाव ३२, लोहा ११९, कंधार २३, महसूल कोविड केअर सेंटर १०२ आणि खासगी रुग्णालयात ३६२ रुग्ण उपचार घेत आहेत. त्याचवेळी गृहविलगीकरणातही मोठ्या संख्येने रुग्ण उपचार घेत आहेत. त्यात मनपा अंतर्गत ३ हजार १५८ आणि जिल्ह्यातील विविध तालुक्यांतर्गत १ हजार ९३ रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. जिल्ह्यात बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८०.८८ टक्क्यावर पोहोचली आहे. हेच प्रमाण ९५ टक्क्यांवरही काही दिवसापूर्वी होते.