नांदेड: मुखेड पाठोपाठ नांदेड शहरालाही कोरोनाने दणका दिला आहे. सोमवारी रात्री उशिरा मुखेड येथे चार रुग्ण आढळल्यानंतर मंगळवारी सकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार नांदेड शहरात नव्याने १४ रग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्हयातील एकूण बाधितांची संख्या २८० इतकी झाली आहे.
मंगळवारी १८० नमून्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. यामध्ये नांदेड मनपा हद्दीमध्ये १४ रुग्णांची भर पडली आहे. सोमवारी रात्री ११८ नमून्यांचा अहवाल प्राप्त झाला होता. यामध्ये मुखेडमधील विठ्ठल मंदिर परिसरातील यापूर्वीच्या कोरोनाच्या रुग्णांच्या संपर्कात आलेले नव्याने चार बाधित आढळले होते. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या २६६ एवढी झाली होती. यात महापालिकेच्या हद्दीतील १४ रुग्णांची भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाच्या रुग्णांची संख्या २८० इतकी झाली आहे. यामध्ये त्या महिला बँकेच्या कर्मचार्यांच्या संपर्कातील बारा जणांचा समावेश आहे.