नांदेड-शहरातील पीरबुऱ्हान नगरातील एका 64 व्यक्तीला कोरोना संसर्ग झाला होता. सहा दिवसाच्या उपचारानंतर त्याचा दुसरा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भोसीकर यांनी सांगितले.
शहरातील पिरबुऱ्हान नगर येथे सहा दिवसापूर्वी कोरोना चा पहिला रुग्ण आढळला होता. त्यामुळे खळबळ उडाली होती. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने पिरबुऱ्हाण नगरचा परिसर कंटेंटमेंट झोन म्हणून घोषित केल्यानंतर हा भाग सील करण्यात आला होता.जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहे.
पिरबुऱ्हाणच्या कोरोना बाधित रुग्णावर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.सहा दिवसाच्या उपचारानंतर रुग्णाचा दुसरा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. मात्र आणखी पाच सहा दिवसानंतर या रुग्णांची कोरोना चाचणी होणार असल्याचेही डॉ. भोसीकर यांनी सांगितले.
पिरबुऱ्हाणनगरातील रुग्णाचा कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने प्रशासनाला थोडा दिलासा मिळाला आहे.येत्या 5 किंवा 6 मे रोजी रुग्णाच्या दुसऱ्यांदा चाचणी घेतली जाणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भोसीकर यांनी सांगितले. दरम्यान अबचल नगर येथे सापडलेल्या पोझीटीव्ही रुग्णाच्या नातेवाईकांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत