नांदेड: मंगळवारी सकाळी ५२ अहवाल प्राप्त झाले. यातील ४७ अहवाल निगेटीव्ह असले तरी लोहार गल्लीतील दोन बालके पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ उडाली आहे. उर्वरीत तीन अहवाल अनिर्णित असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
बाधा झालेल्या दोन बालकांमध्ये एक सात वर्षाची मुलगी आहे तर दूसरा मुलगा अवघा चार वर्षाचा आहे. ही दोन्ही मुले बाधित वृद्ध दाम्पत्याच्या संपर्कातील आहेत. दरम्यान या नव्या दोन रुग्णांमुळे जिल्ह्यातील बाधित व्यक्तींची एकूण संख्या १५१ एवढी झाली आहे. यातील १२० जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. तर २३ जणांवर विविध कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. उपचारास प्रतिसाद न मिळाल्याने ८ बाधीतांचा यापूर्वीच मृत्यू झाला आहे.