नांदेड : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने लॉकडाऊन केला़ परंतु त्यानंतरही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे़ आजचा दिवस तर नांदेडसाठी 'शनि' वार ठरला़ आजपर्यंतचे उच्चांकी असे ९४ बाधित रुग्ण आढळून आले़ त्यामुळे नांदेडची रुग्ण संख्या आता ८६९ वर गेली आहे़ तर शहरातील एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे़
जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येला आळा घालून त्याची साखळी तोडण्यासाठी १३ जुलैपासून लॉकडाऊन करण्यात आला आहे़ परंतु लॉकडाऊनच्या काळातही रुग्ण वाढतच आहेत़ प्रशासनाकडून संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत़ शनिवारी तर आजपर्यंतचे सर्वाधिक ९४ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत़ त्यामध्ये आसरा नगर १, सांगवी आॅफीस कॉलनी १, मधुबन रेसिडन्सी १, सराफा १, देगलूर नाका २, इतवारा १, रहमतनगर १, जुना कौठा १, जुना मोंढा १, स्रेहनगर १, सोमेश कॉलनी १, गणराज नगर १, पांडूरंग नगर १, सराफा बाजार ३, सिडको १, हैदरबाग २, पिरबुºहाण नगर १, सरपंच नगर २, विष्णूनगर २, आदर्श नगर १, सराफा ४, शिवकृपा कॉलनी १, स्वामी विवेकानंद नगर १, काबरा नगर १, प्रेमनगर २, सरपंचनगर ३, प्रकाश नगर ७, चैतन्यनगर १, नंदनवन कॉलनी ३, गोकुळनगर १, साईनगर १, वजिराबाद १, फरांदे नगर १, विष्णूपुरी १, विसावा नगर १, देगलूर १, उपजिल्हा रुग्णालय देगलूर १, नाथनगर देगलूर १, कंधार १, बामणी ता़मुखेड ६, मुक्रमाबाद ता़मुखेड ४, अशोक नगर मुखेड २, सिद्धार्थ नगर किनवट १, एस़व्ही़एम कॉलनी किनवट १, एकता नगर किनवट १, हिप्परगा ता़नायगांव १, कळमनुरी जि़हिंगोली १, वसमत जि़हिंगोली १, जिंतूर जि़परभणी १, गंगाखेड जि़परभणी १, धुळे १, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसर १, परळी जि़बीड १, शक्तीनगर १, सराफा १, मधुबन रेसिडेन्सी ३, विष्णूपुरी ३ आणि वजिराबाद भागात ४ बाधित रुग्णांचा समावेश आहे़ शनिवारी ३५९ जणांचे अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले होते़ त्यापैकी २५४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले़ तर शहरातील विष्णूनगर भागातील एका ६७ वर्षीय पुुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला़ त्यामुळे कोरोना बळींची संख्या आता ४४ झाली आहे़ त्यातील ३८ जण हे नांदेड जिल्ह्यातील तर ६ रुग्ण हे शेजारील जिल्ह्यातील होते़ आतापर्यंत प्रशासनाने १ लाख ४८ हजार २०१ नागरीकांचे सर्वेक्षण केले आहे़ तर ९ हजार ८२६ जणांचे स्वॅब घेण्यात आले होते़ त्यापैकी ७ हजार ८७३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत़ तर ८६९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत़ अद्याप प्रशासनाला ४०७ जणांच्या अहवालांची प्रतिक्षा आहे़ सध्या विष्णूपुरी येथील डॉ़शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ९९, पंजाब भवन येथे ९३, नायगांव १२, जिल्हा रुग्णालयात १९, बिलोली १२, मुदखेड ५, मुखेड २९, हदगांव १, देगलूर १८, माहूर १, गोकुंदा २, लोहा २, कंधार २, धर्माबाद ३, शहरातील खाजगी रुग्णालयात ४४, औरंगाबाद येथे संदर्भित ६ तर एका रुग्णाला निजामाबाद येथे पाठविले़ २अँटीजेन चाचणीमध्ये २८ पॉझिटिव्हआरटीपीसीआर प्रणालीद्वारे केलेल्या तपासणीत ६६ बाधित रुग्ण आढळून आले आहेत़ तर नव्याने अँटीजेन चाचण्या सुरु करण्यात आल्या आहेत़ त्यामध्ये २८ जणांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे़ शनिवारी नायगांव येथील २, डॉ़शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील २, जिल्हा रुग्णालयातील १ अशा सात रुग्णांना घरी पाठविण्यात आले आहे़ आतापर्यंत ४७६ जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे़ तर आजघडीला उपचार घेत असलेल्या ३४९ बाधित रुग्णापैकी १४ महिला आणि १३ पुरुष अशा २७ जणांचे प्रकृती चिंताजनक असल्याचे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे़