शहरं
Join us  
Trending Stories
1
अदानी समूहाला आणखी एक झटका; अडचणीत असताना मोठा आंतरराष्ट्रीय करार रद्द
2
Exit Poll: दोन्ही NCP तुल्यबल; एकनाथ शिंदेच ठरणार वरचढ, उद्धव ठाकरेंना किती जागा मिळणार?
3
१०७ जागांसह भाजपा सर्वांत मोठा पक्ष, महाविकास आघाडीला १०२ जागा; नवीन Exit Pollचा अंदाज
4
Exit Poll: २०१९ मध्ये एकमेव खरा ठरलेला एक्झिट पोल आला; महायुती-मविआच्या मतांत १० टक्क्यांचे अंतर...
5
“गुलाल आम्ही उधळणार, महायुतीची सत्ता ५ वर्ष टिकणार, एकनाथ शिंदेच CM होणार”: संतोष बांगर
6
"सरकार तर स्थापन होऊ द्या"; मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवरुन काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने नाना पटोलेंना झापलं
7
IND vs AUS: ना विराट, ना रोहित, ना बुमराह; ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर 'हा' खेळाडू ठरेल 'हिरो'- पुजारा
8
मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण; हायकोर्टाकडून आरोपीला जामीन
9
"पुतिन यांनी युक्रेनला 'टेस्टिंग ग्राउंड' बनवलं", रशियन मिसाइल हल्ल्यावरून झेलेन्स्की भडकले
10
ICBM मिसाईलवर काही बोलू नका...; रशियाच्या प्रवक्त्याला Live पत्रकार परिषदेत क्रेमलिनचा फोन
11
गुगलला क्रोम ब्राऊझर विकावा लागण्याची शक्यता; अमेरिकन सरकार दबाव टाकणार
12
IND vs AUS: "विराट म्हणजे क्रिकेटचा सुपरस्टार"; ऑस्ट्रेलियन खेळाडूची पत्नी 'किंग कोहली'वर फिदा
13
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना अटक होणार? इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टानं जारी केलं 'अरेस्ट वॉरंट'
14
“अमित शाह यांनी CM भाजपाचा असेल असे कधी म्हटले नाही”; महायुतीतील नेत्याचे सूचक विधान
15
‘लाडकी बहीण’ योजनेचा फायदा महायुतीला मिळेल का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महिलांनी मतदान...”
16
“अदानींविरोधात अमेरिकेत काढलेले अटक वॉरंट म्हणजे देशासाठी शरमेची गोष्ट”: संजय राऊत
17
“लाच देऊन कंत्राटे मिळवल्याचे स्पष्ट, भ्रष्ट गौतम अदानींना अटक का करत नाही?”: नाना पटोले
18
एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदासाठी शरद पवारांसोबत गेले तर...? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!
19
न भूतो, न भविष्यती...! जितेंद्र आव्हाडांकडून एकनाथ शिंदेंची स्तुती; म्हणाले, शिंदेंनी मला मदत केली...
20
Shah Rukh Khan : शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीबाबत खळबळजनक खुलासा

coronavirus : आनंदवार्ता ! नांदेडमध्ये कोरोनाच्या विळख्यातून २६ जण मुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 8:23 PM

शहरातील पंजाब भवन कोवीड केअर सेंटरमधून सोडण्यात आलेल्या २२ रुग्णांपैकी १९ रुग्ण हे पंजाबमधील, एक रुग्ण चंदीगडमधील तर दोन रुग्ण हे स्थानिकचे होते.

ठळक मुद्देसात दिवस घरामध्ये रहावे लागणार क्वॉरंटाईननिगेटिव्ह यात्रेकरुंना सोडण्याचा प्रश्न कायम

नांदेड : कोरोनाच्या जीवघेण्या संकटातून नांदेडमधून २६ जण मुक्त झाले असून गुरुवारी २५ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले तर यापूर्वी एका रुग्णाला घरी सोडण्यात आले होते. शहरातील पंजाब भवन कोवीड केअर सेंटरमधून सोडण्यात आलेल्या २२ रुग्णांपैकी १९ रुग्ण हे पंजाबमधील, एक रुग्ण चंदीगडमधील तर दोन रुग्ण हे स्थानिकचे होते. या रुग्णांना कोणतेही लक्षणे नसल्याने केंद्र शासनाच्या नव्या मार्गदर्शक सूचनांनूसार घरी सोडण्यात आले आहे.

शहरातील पंजाबभवन कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना गुरुवारी दुपारी ४.३० च्या सुमारास कोरोनामुक्त घोषित करुन घरी सोडण्यात आले आहे. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांच्यासह महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नीळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेशसिंह बिसेन यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या २२ रुग्णांना पुष्प देवून घरी सोडण्यात आले. घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांमध्ये १९ रुग्ण हे पंजाबमधील होते. एक चंदीगडचा तर दोन स्थानिक रहिवासी होते.  या सर्व रुग्णांना आवश्यक त्या सूचनांसह ७ दिवस घरीच विलगीकरणात राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

केंद्र शासनाच्या नव्या मार्गदर्शक सूचनानुसार कोरोनाचे विषाणू हे सात दिवसात नष्ट होतात. दहा दिवसानंतर कोरोना रुग्णांपासून इतरांना संसर्ग होण्याचा धोका नाहीसा होतो. त्यामुळे अशा रुग्णांना घरी सोडण्यास हरकत नाही, असे स्पष्ट करण्यात आले होते. त्याच सूचनानुसार नांदेडमध्ये या कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.  पंजाबमधील भाविक कोरोनामुक्त झाल्यामुळे सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. लंगर साहिब येथील जवळपास २४० भाविकांची तपासणी करण्यात आली आहे. त्यातील १५ ते २० जणांना कोरोनाची लागण झाली होती. उर्वरीत सर्व जण कोरोना निगेटिव्ह होते. उर्वरीत सर्वांचीच तपासणी केली जात असून एकूण  तपासणीतील पॉझिटिव्ह अहवालाचे प्रमाण पाहता मोठ्या प्रमाणात रुग्ण असतील ही भीती आता दूर झाली आहे. महापालिकेच्या पथकाकडून श्री लंगर साहिब गुरुद्वारा परिसरात आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहे. पहिल्या टप्प्यात २० रुग्ण आढळल्याने भीती वाढली होती. महापालिका आयुक्त डॉ. लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली श्री लंगर साहिब गुरुद्वारा परिसराला कन्टेन्टमेंट झोन घोषित करुन आवश्यक ते सर्व सर्व्हेक्षण तसेच या भागात ये-जा करण्यास बंदी घातली. श्री लंगर साहिब गुरुद्वारात अडकलेले सर्व २४० भाविक यांच्यासह गुरुद्वाऱ्याच्या सर्व स्थानिक कर्मचाऱ्यांचेही कोरोनाच्या अनुषंगाने स्वॅब घेण्यात आले. स्वॅब घेण्याचे काम येत्या दोन दिवसात पूर्ण होईल, असे मनपा आरोग्य अधिकारी डॉ. बिसेन यांनी सांगितले.

निगेटिव्ह यात्रेकरुंना सोडण्याचा प्रश्न कायमश्री लंगर साहिब गुरुद्वारातून पंजाबमध्ये जवळपास ४ हजार यात्रेकरुंना सोडण्यात आले आहे. असे असले तरीही आणखी जवळपास २५० भाविक हे गुरुद्वाऱ्यात अडकून पडले आहेत. नांदेड जिल्हा प्रशासनाने या सर्वांची कोरोना टेस्ट घेतली आहे. यातील बहुतांश यात्रेकरु हे निगेटिव्ह आले आहेत. जे यात्रेकरु पॉझिटिव्ह आहेत त्यांच्यावर उपचार केल्यानंतर तेही निगेटिव्ह झाले आहेत. अशाच २० रुग्णांना १४ मे रोजी डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आता निगेटिव्ह असलेल्या भाविकांना त्यांच्या मूळ राज्यात सोडण्याबाबत हालचाली आवश्यक आहेत. यामध्ये संबंधित राज्याकडून परवानगी दिली जात नसल्याने यात्रेकरुंना सोडण्यामध्ये अडचणी येत आहेत. पण आता या सर्व यात्रेकरुंचे कोरोना निगेटिव्ह अहवाल असतांना त्यांना परत घेण्यात त्या राज्यांना कोणती अडचण आहे? हाही प्रश्नच आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNandedनांदेड