शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
5
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
6
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
7
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
8
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
9
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
10
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
11
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
12
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
13
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
14
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
15
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
16
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
17
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
18
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
19
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
20
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?

coronavirus : पंजाबमुळेच वाढला प्रादुर्भाव; नांदेडवरील आरोप निराधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2020 2:13 PM

शहराच्या इतर भागातील अवघे दोन रुग्ण असल्याने पंजाबचा नांदेडवरील आरोप आता निराधार ठरत आहे़ 

ठळक मुद्देदीड महिन्यानंतर अवघे ३४ रुग्ण

- विशाल सोनटक्के 

नांदेड : पंजाबमध्ये कोरोनाचा झपाट्याने प्रादुर्भाव वाढत आहे़ सोमवारपर्यंत तेथे बाधित रुग्णांची संख्या १२३२ वर जाऊन पोहोचली आहे़ नांदेडमुळे पंजाबात कोरोना वाढल्याचा आरोप केला जात असताना येथे मात्र सोमवारपर्यंत ३४ जण बाधित आढळलेले आहेत़ त्यातही तब्बल ३१ रुग्ण हे लंगर साहिब गुरुद्वारा परिसरातील असून, शहराच्या इतर भागातील अवघे दोन रुग्ण असल्याने पंजाबचा नांदेडवरील आरोप आता निराधार ठरत आहे़ 

नांदेड येथे दर्शनासाठी आलेल्या आणि लॉकडाऊनमुळे येथेच अडकून पडलेल्या सुमारे ४ हजार भाविकांना केंद्र शासनाच्या परवानगीनंतर तीन टप्प्यात पंजाबला पाठविण्यात आले़ यातील काही भाविकांमुळेच पंजाबमधील कोरोनाचा आकडा वाढल्याचा ठपका ठेवला जात आहे़ मात्र सुमारे दीड महिना हे भाविक नांदेड येथील लंगर साहिब गुरुद्वारामध्ये थांबलेले होते़ त्यांची राहण्याची तसेच भोजनाची व्यवस्थाही केली होती. भाविकांना पंजाबला पाठविण्यापूर्वी एकही रुग्ण बाधित का निघाला नाही?, असा प्रश्न आता नांदेडकरांकडून उपस्थित केला जात आहे़  नांदेडमध्ये मंगळवारपर्यंत १ हजार २३८ व्यक्तींचे स्वॅब तपासण्यात आले असून, त्यातील तब्बल १२३८ अहवाल हे निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. 

कोरोना संसर्गावरून कोणतेही राजकारण करण्याची ही वेळ नाही़ तर या संकटावर एकत्रित येऊन मात करण्याची गरज आहे़ नांदेडहून परतलेल्या भाविकांमुळे पंजाबमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचा आरोप केला जात आहे़ मात्र, त्यात तथ्य दिसत नाहीत़   - अशोक चव्हाण, पालकमंत्री, नांदेड

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNandedनांदेडAshok Chavanअशोक चव्हाण