शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात जोरदार संघर्ष, ७ दिवसांत १०० मृत्यू; कुर्रम जिल्ह्यात हिंसाचार पेटला
2
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
4
जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी
5
देशातील नंबर १ रेस्तराँ कोणतं? Anand  Mahindra यांचीही आहे गुंतवणूक; या यादीत घातलाय धुमाकूळ
6
शेअर बाजारातून चांगला रिटर्न मिळवण्याच्या मोहात गमावले ११ कोटी; अधिकाऱ्यासोबत काय घडले?
7
VI नंबर १, सन्मान कॅपिटल २, इंडियन ऑईल ३... ही अशी कोणती लिस्ट, ज्यात कोणालाही नकोय नाव?
8
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
9
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
10
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
11
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
12
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
13
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
14
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
15
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
16
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
17
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
18
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
19
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर स्वबळाची भाषा सुरू; मविआ फुटीच्या उंबरठ्यावर?
20
महापालिका निवडणुकीत पक्षाचे अस्तित्व टिकवण्याचे उद्धव ठाकरेंसमोर कडवे आव्हान

CoronaVirus : अन्नधान्याचे ओझे वाहणाऱ्या हमालांच्या पोटाला बसतोय चिमटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2020 8:09 PM

नांदेड शहरातील जुना आणि नवीन मोंढा परिसरात जवळपास दीड हजार महिला-पुरूष हमालीचे काम करतात़

ठळक मुद्देशहरात दिड हजारावर हमालव्यापाऱ्यांकडून जपली जातेय माणूसकी

-  श्रीनिवास भोसलेनांदेड : दिवसभर अन्नधान्याचे ओझे स्वत:च्या खांद्यावर वाहणाऱ्या हमालांच्या कुटुंबियांवर सध्या उपासमारीची वेळ येवून ठेपली आहे़ लॉकडाऊनमुळे हाताला काम मिळत नसल्याने अशा शेकडो कुटुंबांना आज शासन, व्यापारी अन् सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत मदत करण्याची गरज आहे़

नांदेड शहरातील जुना आणि नवीन मोंढा परिसरात जवळपास दीड हजार महिला-पुरूष हमालीचे काम करतात़ यामध्ये पुरूषांची संख्या अधिक असून नवीन मोंढ्या पाचशे ते सातशे जण हमाली करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात़ कोरोनामुळे देश लॉकडाऊन असल्याने त्याचा सर्वाधिक फटका मोलमजूरी, हमाली करून खाणाºया कुटुंबाना बसत आहे़

हाताला काम मिळत नसल्याने अनेकांच्या घरात संपूर्ण कुटुंबाचे पोट भरेल एवढं अन्न शिजत नाही, अशी भयानक परिस्थिती काही कुटुंबांमध्ये आहे़ मोंढ्यात येणाºया अन्नधान्य, शेतकºयांचा माल ट्रक वा ट्रॅक्टरमधून उतरून घेण्यासह गाड्या भरण्याचे आणि पोत्यांचे ओझे वाहण्याचे कष्टाचे काम हमाल करतात़ घाम गाळून पोट भरणाºया अशा शेकडो हातांचे काम लॉकडाऊनमुळे गेले आहे़ वाहने बंद असल्याने पायपीट करत मोंढ्यात येवून आणि दिवसभर थांबूनही हाताला काम मिळत नसल्याने रिकाम्या हाताने घरी परतावे लागते़ मात्र, जुना मोंढा परिसरात सध्या किराणा सामान, अन्नधान्याची आवक सुरू असल्याने काही हातांना काम मिळत आहे़ परंतु, नेहमीप्रमाणे मिळणाºया दिवसभराच्या कमाईत घट झाल्याने हमाल विकास बनसोडे यांनी सांगितले़

मालक आले़ धावूऩ़़मुळचे कहाळा येथील असलेले तेलंग बंधू जुन्या मोंढ्यात हमाली करून आपल्या आठ सदस्य असलेल्या कुटुंबाचा गाडा हाकतात़ कोरोनामुळे अचानक हमाली बंद झाली़ त्यामुळे घराचा किराया कुठून द्यायचा आणि दररोज काय खायचे, असा प्रश्न पडला होता़ परंतु, या महामारीत आमच्यासाठी आमचे मालक बालाजी पाटील धावून आले़ त्यांनी अन्नधान्य आणि पैशाचीही मदत केल्याचे गंगाधर आणि अंबादास तेलंगे यांनी सांगितले़

मोंढ्यातील शेतमालाची आवक घटल्याने आमच्या हातालाही काम मिळेना आणि मजूरीही मिळत नाही़ रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे़ त्यामुळे येणारे दिवस कसे काढायचे आणि हा बंद असाच राहिला तर पोट कसे भरायचे, असा प्रश्न हमाल सुनील देवदासे यांनी उपस्थित केला़  

व्यापा-यांचेही दातृत्वआपल्याकडे काम करणाºया मजूर, हमाल आणि त्याचे कुटुंब उपाशी राहू नये म्हणून काही व्यापारी त्यांना पैशासह धान्याचीही मदत करत आहेत़ परंतु, काही हमालांपर्यंत पैसा अन् धान्यही पोहोचत नसल्याची खंत आडत व्यापारी बालाजी भायेगावकर यांनी व्यक्त केली़ त्यांना शासनाने सर्वोत्परी मदत करण्याची गरज आहे़ आपला देश धान्य पिकवणारा आहे़ त्यामुळे देशात कोणीही उपाशी राहू नये, यासाठी प्रयत्न गरजेचे आहेत़

पोलिसांची भीती कायमचलॉकडाऊनमुळे घराबाहेर पडणे कठीण झाले आहेत़ त्यातच काही ठिकाणी पोलीस लाठ्यांचा प्रसाद देत आहेत़ त्यामुळे भीतीपोटील काही हमाल घराबाहेर पडत नाहीत तर ग्रामीण भागातून माल शहरी भागात येत नाही़ गाव, तालुका आणि जिल्हा पातळीवर वाहनांची अडवणूक होत असल्याने हळद, गव्हाचे सिझन असून देखील पोलीसांच्या भीतीने आपला माल नांदेडात घेवून येण्यास धजावत नाहीत़

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNandedनांदेड