नांदेड : जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता रविवारी मध्यरात्री पासून प्रशासनाने संचारबंदी लावली आहे. या काळात काही जणांना सूट देण्यात आली आहे. भाजी विक्रेत्यांनी एका जागी दुकान न थाटता घरपोच भाजी विक्री करण्याची अट घालण्यात आली आहे. परंतु नांदेडमध्ये सकाळच्या वेळी वजीराबादसह छत्रपती चौक भागात भाजी विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती.
या ठिकाणी सोशल डिस्टसिंगचा फज्जा उडवत नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती, त्याचबरोबर शहरात दुचाकी वरून अनेकजण फेरफटका मारत असल्याचे दिसून आले. पहिल्याच दिवशी अशाप्रकारे नागरिकांनी संचारबंदी चे आदेश धुडकावून लावले.