नांदेड : येथील एका खासगी कोविड सेंटरमध्ये शनिवारी रात्री उर्वरित बिलापोटी मृतदेह देण्यास नकार देण्यात आला. एका राजकीय कार्यकर्त्याने मध्यस्थी केल्यानंतर तब्बल १८ तासांनी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.हिंगोली जिल्ह्यातील एक रुग्ण निर्मल कोविड सेंटरमध्ये आला होता. पंधरा दिवस उपचारानंतर एकुण ३ लाख ४४ हजारांचे बिल झाले़ रुग्णाचा शनिवारी मृत्यू झाला. तेव्हा ८० हजारांचे बिल बाकी होते. परंतु नातेवाईकांकडील पैसे संपल्याने त्यांनी बिलात थोडी सुट देण्याची मागणी केली. डॉक्टरांनी अगोदर २५ हजार व नंतर ५० हजार भरा, तरच मृतदेह ताब्यात मिळेल, असा आरोप नातेवाईकांनी केला़ रुग्णालयाने आरोप फेटाळले.
CoronaVirus News: बिलासाठी मृतदेह ताब्यात देण्यास कोविड सेंटरचा नकार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2020 2:43 AM