नांदेड : आजवर कोरोनामुक्त असलेल्या नांदेडमध्ये पहिला रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. मंगळवारी जिल्ह्यातील ९ संशयीतांचे स्वॅब नमुने प्रयोग शाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यातील एका ६५ वर्षीय नागरिकास कोरोना झाल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तातडीने पिरबुºहाननगरसह ५ कि.मी.चा परिसर पुर्णपणे सील करण्यात आला आहे.
मंगळवारी दुपार पर्यंत नांदेड जिल्ह्यातून ४४९ नमुण्यांची तपासणी करण्यात आली होती. त्यातील ३७८ नमुणे निगेटीव्ह आढळूण आले होते. त्यानंतर मंगळवारी रात्रीच उर्वरीत ६६ नमुण्यांपैकी ५७ नमुण्यांचा अहवालही प्राप्त झाला होता. हे सर्व नमुणेही निगेटीव्ह आढळल्याने नांदेडकरांना दिलासा मिळाला होता. उर्वरित ९ नमुण्यांच्या तपासणी अहवालाची प्रशासनाला प्रतिक्षा होती. या नमुण्यांचा अहवाल आज बुधवारी सकाळी प्राप्त झाला. त्यातील एक नागरिक कोरोना बाधित असल्याचे आढळूण आले. ताप, खोकला व दम लागत असल्याने सदर नागरिक २० एप्रिल रोजी शासकिय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल झाल्यानंतर त्याचा स्वॅब घेवून तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. सदर बाधित रुग्णावर उपचार सुरु असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले असून या सील केलेल्या भागात रुग्णाच्या संपर्कात आलेल्या संभावीत संशयीतांच्या तपासणीसाठी वैद्यकिय पथके आणि पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तसेच शहरातील वर्कशॉप कॉर्नर ते आनंदनगर व राजकॉर्नर ते शिव मंदिर या मार्गावरून पिरबुºहाननगरकडे जाणारे सर्व रस्ते सर्व प्रकारच्या वाहतूकीसाठी बंद करण्यात आले आहेत. जिल्ह्यात १४४ कलम लागू असल्यामुळे नागरिकांनी कामाशिवाय घरा बाहेर पडू नये असे आवाहनही पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
५० जणांना केले क्वारंटाईनबुºहाननगर येथील या व्यक्तीने मागील काही दिवसात कुठे कुठे प्रवास केला याचा शोध घेतला जात आहे. सध्यातरी तो काही दिवसापूर्वी केवळ उमरीला जावून आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. दरम्यान रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ५० जणांना क्वारंटाईन करण्यात आले असून पिरबुºहाननगर भागातील दोन खाजगी रुग्णालयेही सील करण्यात आली आहेत. शासकिय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल होण्यापूर्वी सदर रुग्णाने या खाजगी रुग्णालयात उपचार घेतले होते. या दोन पैकी एका रुग्णालयात तो एक दिवस अॅडमिटही होता अशी माहितीही प्रशासनाने दिली आहे.
७० हजार नागरिकांचा होणार सर्वेपिरबुºहाननगर भागात कोरोनाचा रुग्ण आढळूण आल्यानंतर जिल्ह्यातील प्रशाकिय यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. सध्या या रुग्णाची प्रकृती स्थिर असून वैद्यकिय महाविद्यालयातील डॉक्टर या रुग्णावर लक्ष ठेवून आहेत. महानगरपालिकेने पिरबुºहाननगरात तातडीने २०० कर्मचाºयांसह कंटेनमेन्ट सर्वेला सुरुवात केली असून या परिसरातील सुमारे ७० हजार नागरिकांची घरोघरी जावून आरोग्य विषयक माहिती घेण्यात येणार असल्याचे मनपाच्या वतीने सांगण्यात आले.