नांदेड- जिल्ह्यात कोरोना चा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला असून अधिकारी यांच्यासह लोकप्रतिनिधी यांना ही कोरोना ची बाधा झाली आहे. त्यात आणखी एका आमदाराला कोरोना ची बाधा झाली असून नांदेड येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 1600 च्या जवळपास आहे. तर आतापर्यंत 74 जणांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी जिल्ह्यातील एका मंत्र्यासह काँग्रेसच्या दोन आमदारांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यात मंत्री अन एका आमदाराने कोरोनावर मात केली आहे तर अन्य एका आमदारावर मुंबई येथे उपचार सुरू आहेत.
गुरुवारी आणखी एका आमदाराला कोरोना झाल्याचे स्पस्ट झाले आहे. त्यांच्यावर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुढील उपचारासाठी ते मुंबईला जाणार आहेत. कोरोनाची बाधा झालेले ते जिल्ह्यातील चवथे आमदार ठरले आहेत.