नांदेड- शनिवारी नांदेड शहरात 20 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते.यातील काही ‘कोरोना’बाधित रुग्ण पळालले होते. शनिवारी रात्रीपर्यंत 16 जणांचा शोध लागला होता. परंतु अद्यापही 4 जण सापडले नाहीत, त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.
पंजाबहुन परत आलेल्या तीन चालक व एका मदतनीस यास ‘कोरोना’ची बाधा झाल्याने जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, महापालिका खडबडुन जागी झाली आणि श्री गुरुद्वारा लंगर साहिब परिसरातील 97 सेवादारांचे ‘स्वॅब’ चाचणीसाठी घेतले. परंतु त्या सर्वांना अर्धवट माहितीच्या आधारे मोकळे सोडुन देण्यात आले. त्याच 97 पैकी शनिवारी सकाळी 20 जणांना ‘कोरोना’ची लागण झाल्याचे उघडकीस आले होते.
गुरुद्वारा लंगर साहिब परिसरातील 20 कर्मचारी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याना देखरेखीखाली ठेवण्यात आले. मात्र ते तेथून काही वेळेतच निघून गेले आणि सगळा गोंधळ उडाला यातील 20 पैकी केवळ 16 कोरोनाबाधित व्यक्तींचेच संपूर्ण नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक अशी सविस्तर माहिती घेण्यात आली होती. तर त्यापैकी चार व्यक्तींची आवश्यक माहिती महापालिका आरोग्य विभागाकडे उपलब्ध नव्हती. त्यामुळे ‘त्या’ वीस कोरोनाबाधित सेवादार रुग्णास शोधण्यासाठी वजिराबाद पोलीस निरीक्षक संदिप शिवले व पोलीस उपअधीक्षक अभिजीत फस्के यांच्या चमुस दिवसभर चांगलीच कसरत करावी लागली. कोरोना चाचणीसाठी घेतलेल्या व नंतर अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर त्यांचा शोध लागत नसल्याने खुद्द जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर सकाळपासून श्री गुरुद्वारा लंगर साहिब परिसरात ठाण मांडुन बसले होते. तेव्हा कुठे दुपारपर्यंत अकरा जणांना शोधण्यात यश आले. त्यानंतर संध्याकाळी पुन्हा पाच कोरोनाबाधित अशा 16 जणांचा शोध लागला बाकी 4 जण अजून गायब आहेत त्यांचा शोध घेणे सुरू आहेयांपैकी फरार झालेल्या चार ‘कोरोना’बाधितांची अपूर्ण माहिती असल्याने त्यांना शोधता आले नसल्याचे सांगण्यात येत आहे. याविषयी कुणीही माहिती देण्यास तयार नाही. शनिवारी दिवसभर अहवाल हाती पडताच पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांच्या आदेशावरून गुरुद्वारा परिसरात शोधमोहिम राबवून 16 जणांना ताब्यात घेतले. पोलीस निरीक्षक शिवले यांनी सांगितले की, रुग्णाचे पत्ते नीट घेणे हे महापालिकेचे काम आहे, त्यांनी ते व्ययस्थित करायला हवे होते.. त्यामुळेच असे झाले…