नांदेड :जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग गेल्या महिन्याभरात मोठ्या प्रमाणात वाढला आहे़ दररोज सरासरी शंभरहून अधिक बाधित रुग्ण आढळून येत आहेत़ दोन दिवसापूर्वीच कोरोना रुग्णांच्या संख्येने द्विशतक केले होते़ बुधवारी पुन्हा एकदा १९६ बाधित रुग्ण आढळून आले़ तर सहा जणांचा मृत्यू झाला आहे़ त्यामुळे बळींची संख्याही शंभरी ओलांडून १०३ वर गेली आहे़ त्यामुळे नांदेडकरांची चिंता वाढली आहे़
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शेवटचा उपाय म्हणून करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे ही रुग्ण संख्येवर फारसा परिणाम झाला नाही़ आता शनिवार आणि रविवार असे दोन दिवस बाजारपेठा बंद ठेवण्यात येत आहेत़ त्यामुळे शुक्रवारी आणि सोमवारी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे़ त्यामुळे कोरोनाचा धोका वाढतच आहे़ बुधवारी प्रशासनाला ९३३ जणांचे अहवाल प्राप्त झाले होते़ त्यापैकी ६१९ जण हे निगेटिव्ह आढळून आले़ तर १९६ बाधित रुग्ण सापडले़ त्यामध्ये आरटीपीसीआरद्वारे तपासणी केलेल्यांमध्ये अर्धापूर ४, धर्माबाद २, कंधार २, लोहा १, नांदेड २३, मुदखेड १, नायगांव ८, लातूर १, पुणे १, ठाणे १, देगलूर १८, हदगांव १०, किनवट ३, माहूर ३, नांदेड ग्रामीण ४, मुखेड १८, हिंंगोली १, परभणी ४ आणि पुसद येथील २ रुग्णांचा समावेश आहे़ तर अँटीजेन किटद्वारे तपासणी केलेल्यांमध्ये अर्धापूर १, धर्माबाद २, किनवट १, नांदेड शहर ६३, नायगांव ४, परभणी २, बिलोली २, हदगांव ५, माहूर ६, मुदखेड २ आणि मुखेड येथील एक रुग्ण आहे़ तर सहा जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून त्यात नायगांव येथील ५० वर्षीय महिला, साठेनगर मुदखेड ६१ वर्षीय पुरुष, किनवट तालुक्यातील इस्लामपूरा येथील ६० वर्षीय पुरुष, शिवाजी चौक लोहा ७४ वर्षीय पुरुष, वाघी रोड नांदेड ५२ वर्षीय पुरुष आणि शहरातील शिवदत्त नगर भागातील ६४ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे़.
१ हजार ४४४ रुग्णांवर उपचारआजघडीला जिल्ह्यात १ हजार ४४४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत़ त्यामध्ये ३७ महिला आणि १९ पुरुष अशा ५७ जणांची प्रकृती चिंताजनक आहे़ बुधवारी शासकीय वैद्यकीय महाविद्याल विष्णूपुरी येथून ५, हदगांव १०, देगलूर २०, खाजगी रुग्णालय ८, मुखेड २०, धर्माबाद २ आणि पंजाब भवन येथील १० अशा एकुण ७५ जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे़ आजपर्यंत ११३२ जणांनी कोरोनावर मात केली आहे़