- गोविंद टेकाळेअर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : तालुक्यातील दाभड परिसरातील शेतात दाम्पत्याने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे आज सकाळी उघडकीस आले. या दुर्दैवी घटनेत पत्नीचा मृत्यू झाला असून पतीची प्रकृती चिंताजनक आहे.
ललीता डोंगरे ( ३४ ) असे मृत महिलेचे नाव आहे. तर कैलास डोंगरे ( ३६ दोघे रा.वसरणी ता.जि.नांदेड ) यांची प्रकृती चिंताजनक आहे. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनी ए.जी.नागटिळक, कल्याण पांडे, संजय घोरपडे यांनी घटनास्थळी भेट दिली. १०८ रुग्णवाहिकेचे डॉ.आनंद शिंदे, चालक रणधीर लंगडे यांनी कैलास डोंगरे यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, हे दाम्पत्य शुक्रवारी रात्री या परिसरात आल्याची माहिती आहे.