नांदेड : किरकोळ कारणावरुन एका तरुणावर जीवेघणा हल्ला केल्याच्या प्रकरणात न्याक़े़एनग़ौतम यांनी शाहरुख खान, सलमान खान व सद्दाम अशा तिघांना तीन वर्षे सक्तमजुरीसह आठ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली़ चौफाळा भागात २४ फेब्रुवारी २०१३ रोजी ही घटना घडली होती़
चौफाळा भागातील हनुमान मंदिरासमोर रात्री आठ वाजेच्या सुमारास विजय माधव कोमटवार (वय १७) हा तरुण उभा होता़ यावेळी शाहरुख खान, सलमान खान आणि शेख सद्दाम हे तिघे जण त्या ठिकाणी आले़ यावेळी त्यांनी कोमटवार यांना आमच्याकडे डोळे वटारुन का पाहतोस असे म्हणून मारहाण करण्यास सुरुवात केली़ तिघांपैकी दोघांनी विजयला पकडले़ त्यानंतर एकाने लाकडाने विजयच्या डोक्यावर मारले़ त्यानंतर विजयला उपचारासाठी मुंबईला दाखल करण्यात आले होते़ परंतु डोक्यावर खोल जखम झाल्यामुळे विजयला जवळपास तीन वर्षे बोलता आले नाही़
या प्रकरणात विजयचे वडील माधव कोमटवार यांच्या तक्रारीवरुन इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता़ पोलीस उपनिरीक्षक दिनेश सोनसकर यांनी प्रकरणाचा तपास करुन शाहरुख खान कलीम खान पठाण (वय १९), सलमान उर्फ रहिम सलीम खान (१९) दोघे रा़हातजोडी, चौफाळा आणि शेख सद्दाम श्ेख मजहर (२१) रा़सैलाबनगर या तिघांना पकडले होते़ त्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले़ तीन वर्षे कोमटवार याचा जबाब घेता आला नव्हता़ सरकारी वकील अॅड़एम़ए़बतुल्ला यांच्या विनंतीनंतर कोमटवारचा जबाब घेण्यात आला़ या प्रकरणात आठ साक्षीदार तपासण्यात आले़ उपलब्ध पुराव्यावरुन न्याग़ौतम यांनी शाहरुख खान, सलमान खान आणि सद्दाम या तिघांना तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली़ गौतम कांबळे यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम केले़.