वाईबाजार : बिबट्याने शेतातील आखाड्यावर असलेल्या गायीवर हल्ला करून तिचा फडशा पाडल्याची घटना २० फेब्रुवारी रोजी घडल्याने मदनापूर-करळगाव परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.माहूर तालुक्यातील जंगलात जलसाठा शिल्लक नसल्याने पाण्याच्या शोधात जंगली जनावरे गावशिवारात भटकत आहेत. मदनापूर-करळगाव शिवारात २० रोजीच्या रात्री विजय भाऊराव राऊत (रा.मदनापूर) यांच्या करळगाव शिवारातील शेतामध्ये आखाड्यावर दावणीला बांधलेल्या गायीवरबिबट्याने हल्ला करुन ठार केल्याची घटना २१ रोजी निदर्शनास आली.विजय राऊत यांनी घटनेची माहिती माहूर वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाच्या तुळशी बीटला कळविताच वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीधर कवळे यांच्या मार्गदर्शनात वनपाल यु.आर.पवार, वनरक्षक एस.के.तेलेवाड यांनी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष दांडेगावकर यांचेसह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला़
बिबट्याने पाडला गायीचा फडशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 12:37 AM