आजच्या अर्थसंकल्पामध्ये राज्यातील ७ जिल्हयात नविन वैद्यकीय महाविद्यालये निर्माण करण्याचा निर्णय झाला आहे. यामध्ये मराठवाड्यातील परभणी व उस्मानाबादसह सिंधुदुर्ग, रायगड,सातारा, नाशिक, अमरावती या शहरांचा समावेश आहे.
याबाबत डी.पी.सावंत म्हणाले की, मी राज्याचा वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री असताना ज्या जिल्हा मुख्यालयी सामान्य रुग्णालय आहे अशा ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालयाची निर्मिती करण्यात यावी असा मसुदा तयार केला होता. त्या आशयाची एक टिप्पणी तयार करुन या टिप्पणीवर मी स्वतः स्वाक्षरी केली होती. तत्कालीन मुख्यमंत्र्यांची या बाबींसाठी सहमती होती. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेवून राज्यामध्ये नविन वैद्यकीय महाविद्यालय निर्माण करणे गरजेचे होते. अशावेळी या महाविद्यालयांची निर्मिती म्हणजे आरोग्यसेवा सुदृढ करण्याचे पुढचे पाऊल असून या वैद्यकीय महाविद्यालयांची निर्मिती म्हणजे २०१२ मध्ये तयार केलेल्या मसुद्याची फलश्रुती असल्याचे मत सावंत यांनी व्यक्त करतानाच शासनाच्या या निर्णयाचे स्वागतही केले आहे.