अल्लापूर येथील शेतीनिष्ठ शेतकरी शशिकांत पाटील यांच्या हस्ते क्रिकेट सामन्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बालाजी पाटील इब्राहिमपूरकर, हणमंत देशमुख, मारोती देशमुख, गंगूराम देशमुख, शिवलिंग देशमुख, शंकर देशमुख, अशोक देशमुख, बालाजी ताटे पाटील, बापूराव पाटील, मारोतराव लुटे, संतोष देशमुख, अनिल देशमुख, माजी सरपंच दशरथ बिजलीकर, गंगाधर कांबळे, संजय अल्लापूरकर, बापूराव वाघमारे आदी मान्यवरांसह शंभर खेळाडूंची उपस्थिती होती.
प्रथम पारितोषिक ११ हजार १११ रुपये, तर द्वितीय पारितोषिक ७ हजार ७७७ रुपये आहे. याशिवाय मॅन ऑफ दी सिरीज, मॅन ऑफ दी मॅच, बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅटस्मन हे पुरस्कारही दिले जाणार आहेत. या क्रिकेट सामन्याचे आयोजन योगेश देशमुख, बालाजी हिवराळे, संभाजी अल्लापुरे, जगदीश देशमुख, पंढरी बिजलीकर, चंद्रकांत तळेगावे, शिवाजी लुटे आदींनी केले आहे.
वाजपेयी यांना जयंतीनिमित्त अभिवादन
देगलूर : भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना जयंतीनिमित्त येथील वै. धुंडा महाराज देगलूरकर महाविद्यालयात अभिवादन करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांशी साधलेल्या संबोधनाचे थेट प्रक्षेपण प्रोजेक्टरवरून दाखविण्यात आले.
तालुकाध्यक्ष शिवाजी कनकंटे, शहराध्यक्ष अशोक गंदपवार, मुकुंद भुताळे, सतीश जोशी, भूमन्ना चिलवरवार, व्यंकटेश पबितवार, दिगंबर कौरवार, सूरज मामिडवार यांच्यासह अनेक कार्यकर्ते व आसपासच्या गावातील शेतकरी उपस्थित होते.
शांतता समितीची बैठक
फुलवळ : येथील ग्रा.पं. निवडणुकीसंदर्भात पोलीस निरीक्षक व्ही.व्ही. गोबाडे यांनी बैठक घेऊन मार्गदर्शन केले. यावेळी बीट जमादार मधुकर गोन्टे, सुनील पत्रे, मगदुम, तंटामुक्ती अध्यक्ष डी.टी. मंगनाळे, एन.जे. मंगनाळे, नवनाथ बनसोडे, बालाजी देवकांबळे आदी उपस्थित होते.